<
जामनेर-(प्रतिनिधी) तालुक्यात काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. काही कोरोना बधितांचा मृत्यु सुद्धा झाला आहे. फक्त कालबाह्य झालेली टायफाईड ची चाचणी करून योग्य उपचार न घेता अधिक प्रमाणात सलाईन लावल्यामुळे बऱ्याच रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.या अनुषंगाने तहसीलदार यांनी टायफाईड चाचणी च्या रुग्णांची खाजगी डॉक्टर व लॅब ला कोरोना अँटीजन व आर टी पी सी आर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या व मृत्यु याची दखल घेऊन प्रांताधिकारी प्रसाद मते यांच्या सूचनेनुसार तहसीलदार अरुण शेवाळे व गटविकास अधिकारी जे.व्ही.कवळदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र जेथे दररोज कोरोना चाचणी कॅम्प घेण्यात येतात त्याव्यतिरिक्त ज्या गावात कोणत्याही कारणाने मृत्यु झाला असेल तेथे मृतांच्या नातेवाईकांची तात्काळ कोरोना चाचणी करून त्याच गावात अजून अतिरिक्त कोरोना चाचणी कॅम्प चे आयोजन करण्यात येत असते.
आज झालेल्या कॅम्प मध्ये
चिंचखेडा कॅम्प 70 पैकी 1 पॉझिटिव्ह
नेरी दिगर कॅम्प 31 पैकी 1 पॉझिटिव्ह
महुखेडा कॅम्प 56 पैकी 3 पॉझिटिव्ह
तोंडापुर कॅम्प 127 पैकी 24 पॉझिटिव्ह.
रामपूर कॅम्प 43 पैकी 0 पॉझिटिव्ह
वाडीकिल्ला कॅम्प 123 पैकी 18 पॉझिटिव्ह
नाचनखेडा 80 टेस्ट 0 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
कोरोना टेस्ट कॅम्प साठी डॉ.सारिका भोळे, डॉ.नामदेव पाटील,डॉ.अमृता कोलते, डॉ.कुणाल बावस्कर,डॉ.पंकज माळी, डॉ.विजयसिंग पाटील,डॉ.विजया जाधव-पाटील यांचयसह टीमचे सहकार्य लाभले.
जामनेर तालुक्यात दोन आठवळ्याची माहिती घेतली असता जामनेर 8 नेरी दिगर 2,नेरी बुद्रुक 1,तोंडापुर 4,चिंचखेडा 2,चिंचखेडा तपोवन 1,माहुखेडा 1,खडकी 1पहुर 8 पाळधी 4 याप्रमाणे मृत्यू झाल्याचे दिसून आले.