<
चिंचोली पिंप्री /प्रतिनिधी– विश्वनाथ शिंदे
चिंचोली पिंप्री येथे आज रोजी वैद्यकिय तालुका अधिकारी dr.राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली 32 लोकांचे कोरोना टेस्ट घेण्यात आले. त्या मध्ये ५ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या ह्या महामारी ने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असल्याने आम जनतेत घबराहट निर्माण होत आहे . अगोदर रुग्ण जळगाव ,औरंगाबाद, पुणे,मुंबई,नागपूर,अशा मोठ्या शहरी भागात दिसुन येत होते परंतु आता गावातील गल्लो-गल्ली मध्ये दिसुन येत असल्याने दहशतीचे सावट तयार झाले आहेत. यासाठी गावातील संपूर्ण निर्जंतकी करण होणे गरजेचे आहे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना टेस्ट कॅम्प लावणे गरजेचे असुन कोरोना रुग्णांची संख्या ४५ ते ६० वयोगयातील रुग्ण आढळून आले. रुग्ण तपासणी करतांना आरोग्य सेवक पुरुषोतम वाणी, आरोग्य सेविका सौ.कलीदा, आशा सेविका सौ.सविता अवचार,सौ. ज्योती महाले,यांनी सहकार्य केले.चिंचोली पिंप्री ग्रामपंचायत ग्रामसेवक गणेश पाटील, पोलीस पाटील वसंत लोखंडे,यांनी गावातील गावातील जनतेला सूचना देऊन अव्हान केले की कोरोना महामारी बद्दल जळगाव जिल्ह्याचे कलेक्टर यांचे आदेशांचे पालन करा.