<
प्रतिक्रीया – संबधीत परिपत्रक रद्द करण्यात आले असुन आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करित असतो – डॉ. रा. द. कोकाटे – प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्या मध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की, मंत्री व वरिष्ठ यांच्या कडे तक्रार करू नये व केल्यास आपल्यावर कार्यावाही करण्यात येईल. व कारवाईच्या परिणामांना विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील असे नमुद केलेले आहे.
यावर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे व कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ऑनलाईन निवेदन मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पाठविण्यात आले असल्याचे अॅड अभिजीत रंधे यांनी सांगितले.
प्राचार्य यांनी प्रकट केलेले परिपत्रक दडपशाही ला पुरस्कृत करते आणि आम्ही ह्या परिपत्रकाचा जाहीर निषेध नोंदवत आहोत तसेच सदर परिपत्रक रद्दबातल न केल्यास महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियन कडुन संपुर्ण महाराष्ट्र भर संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन खान्देश विभाग प्रमुख अॅड अभिजीत रंधे, प्रदेश सहसचिव दिपक सपकाळे, खान्देश विभाग सचिव चेतन चौधरी, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, यांनी पाठवले आहे.
सत्यमेव जयते न्यूजच्या प्रतिनिधी यांनी संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, सदर परिपत्रक रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.