<
जळगाव- पर्यावरण जतन आणि संवर्धन ही आजची गरज आहे. वाढते प्रदुषण आपल्यासाठी हानीकारक आहे. म्हणूनच आपण सर्वांनी निसर्गाला हानी न पोहोचवणाऱ्या वस्तू वापरूया आणि निसर्गाचा बचाव करूया. पर्यावरणाचा समतोल राखत समृद्धीच्या दिशेने वाटचाल करुया.यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात झाडे लावावी लागतील.आणि ती झाडे जगवावी लागतील याच विचाराने प्रेरित होत.कांचन नगर परिसरातील युवकांनी परिसरात वृक्षलागवड केली.
तापमान रोखण्यासाठी वृक्षलागवड करून वातावरणातील समतोल राखणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक उपक्रम शासकीय पातळीवर राबविण्यात आले .पण यांत आपला वैयक्तीक सहभाग असावा व आपला परिसर हिरवागच्च करायचा याच विचाराने कांचन नगर,विलास चौक परिसरात वड,पिंपळ,निंब, जांभूळ, आंबा, सोनचाफा, रेन ट्री, बदाम यांचे वृक्षारोपण केले. यावेळी प्रकाश बाविस्कर, सोनु सोनार, आकाश सोनवणे, अमोल धडे, आकाश पाटील, गोपी वाणी आदीजण उपस्थित होते .
बातमी नैसर्गिक संपत्ती वाढविण्याचे उद्देशा ने छान प्रसारीत केली आहे.
THANKS