<
फत्तेपूर – (प्रतिनिधी) – फत्तेपुर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपनिरीक्षक राहुल खताड व तालुका वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ राजेश सोनवणे यांच्या उपस्तीत उपसरपंच ईश्वर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोव्हिडं 19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत सर्व ग्रामपंचायत सदस्य व फत्तेपुर येथील खाजगी डॉक्टर व खाजगी लॅब संचालक हे उपस्तीत होते.
गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून अशोक पालवे यांनी फत्तेपुर व फत्तेपुर परिसरात शनिवार,रविवार व सोमवार अशा तीन दिवसांचा लॉक डाउन गटविकास अधिकारी यांच्या वतीने जाहीर केला.
या तीन दिवस फत्तेपुर,लोणी,मादनी,
गोद्री, तोरणाळा,चिंचोली, कसबा पिंपरी,पिपळगाव, टाकळी, हिंगणे, तोंडापुर, या ठिकाणी कडक लॉक डाउन करण्यात येणार आहे सदर दिवशी बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी राहणार आहे.
तसेच गावातील नागरिक सुद्धा बाहेर गावी जाणार नाहीत.
वैद्यकीय सेवा व मेडिकल दुकाने फक्त उघडी राहतील.
दुध डेअरी सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 5 ते 6 उघड्या राहतील.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या घेतलेल्या निर्णयाला पोलीस प्रशासनाची सर्वतोपरी मदत राहील तसेच तीन दिवस सर्व प्रवासी वाहतूकीची व माल वाहतूक वाहनांची वाहतूक पोलिसांमार्फत कडक तपासणी करण्यात येईल असे याप्रसंगी पोलीस निरीक्षक राहुल खताड यांनी सांगितले तसेच आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या कार्याचे कौतुक करून त्याच्या कार्यास सलाम केला.
सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, पोलीस निरीक्षक राहुल खताड, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत, डॉ. योगेश राजपूत,ग्रामविस्तार अधिकारी अशोक पालवे,माजी पंचायत समिती सदस्य संजय चौधरी,माजी उपसरपंच सलीम पटेल, तालुका हिवताप पर्यवेक्षक व्ही. एच.माळी,आरोग्य सहाय्यक भागवत वानखेडे,आरोग्य सेवक सुनील पाटील,आरोग्य सेविका कविता वाहूळे,फत्तेपुर येथील सर्व खाजगी डॉक्टर,लॅब संचालक, आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार,
जि. प.शिक्षक उपस्थित होते.