<
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी RT-PCR TEST आणि COVID लसीकरण हा मुख्य उद्देश ठेवून शासनस्तरावरून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत, त्याचधर्तीवर ग्राम प्रशासन, ग्रामसेवक, तलाठी, जि. प. उच्च प्राथमिक शाळा, सुलज, आशाताई, पोलीस पाटिल यांच्या संयुक्त विद्यमाने घरोघरी जाऊन COVID लसीकरण याची माहिती दिली, तसेच लसीकरणाचे फायदे समजून सांगितले, लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजांना अतिशय उत्तम पणे प्रबोधन केले आणि गावातील ४५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला – पुरुष यांना लवकरात लवकर लसीकरण करून घ्या असे आव्हान केले, सोबतच लसीकरण केलेला लोकांची पण आपुलकीने विचारपूस केली. लसीकरण केलेल्या लोकांनी सुद्धा त्यांचे अनुभव सांगितले, त्यामुळे लोकांच्या मनातील गैरसमज व भीती दूर झाल्याबाबत लोकांनी मत व्यक्त केले. जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना शासन नियमांचे पालन करा, नियमित मास्क चा वापर करा, सुरक्षित अंतर पाळा तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व वाहतूकदार यांना सुद्धा तत्काळ ताकीद देऊन बंद करण्यास सांगितले. कोविड लसीकरण आशा ताई यांनी मुख्य भूमिका पार पाडली, सोबत तलाठी यांनी शासन नियम आणि त्यांची अंमलबजावणी या बाबत मार्गदर्शन केले, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी शाळकरी मुलांची आपुलकीने चौकशी करून नियमीत मास्क लावा, बाहेर खेळतांना गर्दी करू नका, सुरक्षित अंतर ठेवा तसेच पालकांना सुद्धा कोरोना महामारीबाबत घरोघरी जाऊन उत्तम मार्गदर्शन केले, घरोघरी जाऊन जनजागृती करण्यामध्ये ग्रामसेवकासह ग्रामसदस्य सहभागी झाले होते त्यांनी पण जास्तीत जास्त लोकांना लसीकरण घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जा, असे आव्हान केले. कोरोना लसीकरण बाबत घरोघरी जाऊन जनजागृती केल्यामुळे लसीकरण बाकी असणाऱ्या लोकांनी प्रेरणा घेऊन तत्काळ गावापासून जवळच (३ किमी) असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाण्यास तयारी केली, तर काही लोकांनी मी कोरोना लस घेण्यासाठी निघालो आहे, असे सांगितले. जनजागृती करणाऱ्या सर्वांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं व जनजागृतीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी जागृत होऊन कोरोना सारख्या जागतिक महामारीतून स्वतःला, कुटुंबाला आणि मित्र परिवारासह आप्तस्वकीयांना सुरक्षित आणि निरोगी ठेण्यासाठी स्वइच्छेने बंधने व नियम पाळा असे आव्हान शिक्षणक्रांतीचे राज्य समन्वयक यांनी केले.