<
जळगाव – (प्रतिनिधी)- चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंप्री येथील रहिवाशी यांची भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्या मिझोरम, मणिपूर आणि मेघालय राज्य संचालक पदी नियुक्ती झाली आहे. त्यांची पहिली पोस्टिंग गडचिरोली येथे झाली होती. तेथे त्यांनी चांगले काम करुन प्रशासन आणि सरकारच्या माध्यमातून तेथील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले होते. तसेच त्यांनी आतापर्यंत नाशिक, बीड, धुळे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सेवा दिली तसेच त्यांची कर्नाटकातील बंगलोर येथे उपसंचालक पदाचा कार्यभार सांभाळला. डायरेक्टर जनरल यांनी त्यांना बढती देत त्यांची मिझोरम, मणिपूर आणि मेघालय राज्य संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.