<
यशस्वी लढा कोरोनाशी , शासन व प्रशासनाच्या सुचना व नियमांचे पालन करीत फिजिकल डिस्टेंट ठेऊन यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांनी गुढीपाडवा,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच पवित्र रमजान मासारंभ या शुभ मुहूर्तावर निराधार गरजूंना किराणा किट,धान्य व खजूर वाटप करून एक हात मदतीचा या उद्देशाने सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाउन आहे.उद्योग व्यवसाय बंद असल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेता ही वेळ मदतीची आहे प्रसिद्धिची नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले.नगरसेविका योजना पाटील सामाजिक उपक्रमात सतत सहभागी होऊन जनजागृती तसेच मदतकार्यात प्रेरणादायी कार्य करीत असतात.तसेच कोरोना प्रतिबंध जनजागृती व आरोग्य मंत्र पत्रक वाटप करून लसिकरण करा,काळजी घ्या,मास्क वापरा,सुरक्षित रहा व प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन करीत आहेत.या सेवा मदत कार्यास तहसीलदार सागर धवळे, पी.आय.अशोक उतेकर,मुख्याधिकारी विकास नवाळे,आरोग्याधिकारी डॉ.पंकज जाधव,डॉ.प्रतिक भोसले यांचे मार्गदर्शन लाभत आहे.सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.