<
चिंचोली पिंप्री/ प्रतिनिधी- विश्वनाथ शिंदे आज दिनांक14/4/2021 रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न क्रांतिसूर्य महाविद्वान महानायक महान इतिहास संविधान निर्मिता युगपुरुष भारतरत्न डॉ बाबा साहेब यांची जयंती निमित्त चिंचोली पिंप्री येथे समाज मंदिरात,मराठी शाळा, तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच सौ आरिफा तडवी, माजी सरपंच विदयामान उपसरपंच विनोद चौधरी यांच्याहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला गावाचे सरपंच सौ आरिफा तडवी ,उपसरपंच विनोद भाऊ चौधरी, गावातील पोलीस पाटील वसंत लोखंडे, ग्रामसेवक गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संलिप्त साळवे, ग्रामपंचायती चे सर्व सदस्य उपस्थित होते. त्याच जयंती समितीचे अध्यक्ष तथा (पत्रकार)विनोद भाऊ सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते मकुंदा सौमवंशी, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत पाटील, सर वैदय सर , दिपक सोनार,तडवी सर ,पाटील सर,निखिल पाटील ,दगडु जाधव,शकलाल तडवी,गजानन वॉटर्मन,अरुण गायकवाड,तसेचं गावातील १५ ते २०सामाजिक कार्यकर्ते हजर राहून सोशल दिस्टेशंनचे पालन करण्याचे कार्य केले. शासनाचे नियम आमलात घेऊन त्यांचे काटेकोर पणे पालन करून कार्यक्रम साजरा केला गेला. जामनेर लगत रामपुर तांडा या गावी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जंयती साजरी केली. या प्रसंगी शिवसेनेचे वाघारी,बेटावद गटातील गटातील प्रमुख सुमित चव्हाण यांच्या हस्ते भारतरत्न बाबा साहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले, या ठिकाणी ईश्वर चव्हाण, जगदेव मोरे,दिलीप चव्हाण,नवल चव्हाण,काशिनाथ लोखंडे,आकाश मोरे व तसेच शिवसैनिक बांधव उपस्थित होते.