Saturday, July 12, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लैंगिक शिक्षण व लैंगिक आरोग्य काळाची गरज

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/04/2021
in लैंगिक शिक्षण, विशेष
Reading Time: 1 min read
लैंगिक शिक्षण व लैंगिक आरोग्य काळाची गरज


भारतीय समाजाबद्दल विचार केला असता, कामजीवन आणि लैंगिक शिक्षणाबद्दल बरेच समज गैरसमज समाजात प्रचलित असल्याचे दिसून येते. माध्यमिक व उच्च शाळांत लैंगिक शिक्षण हे प्रजनन, मासिक ऋतुचक्र, जननेंद्रियांचे आरोग्य, त्यांचे रोग (गुप्तरोग, एड्स इ.), लैंगिक अपमार्गण ह्यांवर केंद्रित असावे. शाळेमध्ये त्या त्या विषयाच्या तज्ञांकडून हे शिक्षण दिले जावे व त्यात ज्ञानाच्या अचूकपणावर भर असावा. जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र वगैरे विषयांतील तज्ञ माणसे, त्याचप्रमाणे डॉक्टर व परिचारिका ह्यांचादेखील त्यात सहभाग असावा.

आज मोठ्या प्रमाणावर विज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. किशोरवयीन मुलांपासून सर्वचजण मोबाईलचा वापर करत आहेत. पोर्नोग्राफी व्हिडीओ पाहण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेकवेळा वाढत्या वयातील मुलांना याचे दुष्परिणाम लक्षात येत नाहीत. त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. मानसिक, भावनिकदृष्ट्या मुले अस्वस्थ होतात. वयात आलेल्या मुला-मुलींची चिडचिड होते. ही मुले फक्त मानसिक आणि भावनिकदृष्ट्या अस्वस्थच होत नाहीत तर अस्थीर सुद्धा होतात. शारिरीक आकर्षण आणि लैंगिक सुख याबद्दल मुला-मुलींची उत्सुकता ताणली जाते. शाळेतील शिक्षकच नाही तर पालकही या विषयावर मुलांशी मोकळेपणाने बोलत नाहीत.

लैंगिक स्वास्थ्याचा मानवी आरोग्याशी निकटचा संबंध आहे. लैंगिक आरोग्याचा विचार करण्यासाठी आधी लैंगिकतेचा सकारात्मक पद्धतीने विचार करायला पाहिजे. लैंगिकता, लैंगिक नाती तसंच सुरक्षित आणि सुखकर लैंगिक संबंध, ज्यामध्ये जबरदस्ती किंवा हिंसा नाही असे लैंगिक संबंध या सर्वांचाच विचार लैंगिक आरोग्यामध्ये आवश्यक आहे. लैंगिकदृष्ट्या सक्षम, सामान्य, निरोगी आयुष्य जगायला लैंगिक शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. लग्नपूर्व लैंगिक संबंध, एकतर्फी प्रेम, लिंगभाव अशा विषयांना लैंगिक शिक्षणामध्ये प्राधान्य असणे गरजेचे आहे. किशोरावस्था ही एक संक्रमणावस्था आहे. या टप्प्यात शरीरामधे अनेक बदल होत असतात. कामजीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, लैंगिक प्रवृत्ती, लैंगिक वर्तनाविषयीची भूमिका, मूल्ये, लिंगभाव जाणीव व स्त्री पुरुष समानता (Gender & gender equality) या गोष्टींवर लैंगिक शिक्षणामध्ये चर्चा होणे नितांत गरजेचे आहे.

तरुण पौढ जे नुकतेच यौवनावस्थेतून गेले आहेत, अशांना शरीरातील अंग व त्यांची पुनरोत्पादन क्षमतेविषयी ज्ञान असणे गरजेचे असते. या वयात लैगिक शिक्षण हे फक्त पर्यायी शिक्षणाचा भाग नसून त्याचे ज्ञान असणे किशोरांसाठी आवश्यक असते. त्यांना या वयात नातेसंबंधांविषयी व सुरक्षित संभोगाविषयी माहिती असणेही आवश्यक असते. जेणे करुन प्रसंग ओढावल्यास आपले वर्तन कसे असावे याची जाणिव त्यांना होईल.लैंगिक शिक्षणाचा जो भाग वर्गातील पाठामध्ये अंतर्भूत करता येत नाही, त्यासाठी तज्ञांची चर्चात्मक व्याख्याने आयोजित करावीत.

मुलामुलींत परस्परांविषयी आकर्षण निर्माण होणे हा निसर्गनियम आहे. वाढत्या वयाबरोबर मुलांमध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक बदल घडत असतात. कामोत्तेजक भावना निर्माण होतात आणि या बदलांविषयी त्यांच्यांमध्ये कुतूहल निर्माण होते. त्या अवस्थेतून त्यांना सुखरूप बाहेर पडता यावे, यासाठी लैंगिक शिक्षणाची आत्यंतिक गरज आहे. लैंगिक शिक्षणाच्या माध्यमातून लैंगिकतेकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची मनोवृत्ती तयार झाली, तर कामवासनेच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी निश्चितच वातावरणनिर्मिती होऊ शकते. जीवनातील शिस्त, आनंद कायम ठेवणे, तरुणाईचे चारित्र्यसंवर्धन, उज्ज्वल भविष्य आणि समृद्ध राष्ट्र यांसाठी लैंगिक शिक्षणाची आवश्यकता आहे. लैंगिक शिक्षणाने घडून येणारी लैंगिक साक्षरता हा लैंगिक शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
लैंगिक हे सर्व शिक्षण अतांत्रिकी (नॉन-टेक्निकल) भाषेत करावे. लैंगिकता ही जीवनातील एक प्रबळ व विधायक शक्ती, प्रेरणा आहे व विद्यार्थ्यास तिच्यातील जे चांगले, निकोप- निरोगी व वांछनीय आहे, त्याचे रसग्रहण करण्यास शिकविले पाहिजे. त्याचप्रमाणे लैंगिक अपमार्गण, स्वैराचार ह्यांची अनिष्टता व ते टाळण्यासाठी आवश्यक असलेली आरोग्यकारक दृढ मनोवृत्ती ह्यांचा त्यांच्यात विकास केला पाहिजे. लैंगिक शिक्षणावर टिका करणारे लोकही आहेत. लैंगिक शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यामध्ये नको त्या विषयात नको तितका रस निर्माण होईल असे मत व्यक्त करणारेही आहेत.

मानसशास्त्रज्ञांचे म्हणणे असे आहे, की जननेंद्रियांविषयी अज्ञान, गैरसमजुती, प्रबळ लैंगिक प्रवृत्तीला दमन करून गवसणी घालण्याची धडपड ह्यांमुळे अनिष्ट मनोवृत्ती निर्माण होतात व परिणामतः व्यक्तीचे आणि पर्यायाने समाजाचे मानसिक आरोग्य धोक्यात येते; म्हणून लैंगिक शिक्षण देऊन मुलांचे त्याविषयी गैरसमज दूर करणे, निसर्गनिर्मित वस्तुस्थितीची योग्य शब्दांत ओळख करून देणे व विवेकाने दुष्ट वृत्ती ताब्यात ठेवण्यास त्यांना मदत करणे हे अधिक आरोग्यप्रद आहे.

भारतात स्वातंत्र्योत्तर काळात देशाला लोकसंख्याविस्फोटापासून वाचविण्यासाठी ‘कुटुंबनियोजन’ व ‘कुटुंबकल्याण’ ह्या नावांनी संततिनियमनाची योजना राबविली जाते; परंतु शासकीय पातळीवर विवाहपूर्व लैंगिक शिक्षण दिले जात नाही. तसेच तारुण्य प्राप्त होण्यापूर्वीच्या काळात मुलामुलींना शासकीय खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट इ. प्रभावी प्रचारमाध्यमांचा उपयोग करणे गरजेचे आहे.

आज शालेय पातळीवरील लैंगिक शिक्षणाबरोबर पालकांनीही मुलांना विश्वासात घेऊन मुलांच्या मनातील समज – गैरसमज यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांच्या मनातील अनेक गैरसमज दूर व्हायला मदत होईल. तसेच भविष्यामध्ये होणाऱ्या परिणामांपासून मुले वाचतील. वाढत्या वयातील शारिरीक आकर्षण, लैंगिकतेविषयी उत्सुकता असणे हे स्वाभाविक आहे. मुलांच्या प्रश्नांना पालक व शिक्षकांनी उत्तरे देणे गरजेचे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये लैंगिकतेवर खुलेपणाने चर्चा करणे अयोग्य मानले जात असले तरी आज समाजामध्ये बलात्काराचे वाढते प्रमाण आणि त्या बलात्कारामध्ये किशोरवयीन मुलांचा असलेला सहभाग ही गंभीर बाब आहे. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

फक्त बलात्काराचेच प्रकरण नाही तर छेड-छाडीची आणि विनयभंगाची प्रकरणही समाजामध्ये घडत असलेली आपण बघत आहोत. या सर्व प्रकरणांचा आपण सखोल अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की, किशोरवयीन लहान मुलांबरोबर विवाहपूर्व तरुणांचा यामध्ये समावेश मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व गोष्टीमुळे तरुण – तरुणींच्या आरोग्याला तर धोका आहेच पण त्याचबरोबर सामाजिक आरोग्य आणि सलोखा बिघडून जाण्यास या अनैतिक गोष्टी कारणीभूत आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

या घडून येणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला अनैतिक वाटत असल्या तरी या सर्व गोष्टींसाठी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरीत्या आपली समाजव्यवस्था कारणीभूत आहे हे विसरून चालणार नाही. आज लहान मुलांबरोबर वृद्धांच्याही लैंगिक समस्यांकडे आपल्याला डोळेझाक करून चालणार नाही. समुपदेशन, चर्चा, प्रश्नोत्तरे यांच्या माध्यमातून शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे. यातील महत्वाचा भाग असा की, भावनिक आधार देणे हा होय. चुकलेल्या – पाय घसरलेल्या तरुण – तरुणी किंवा प्रौढ व्यक्तीला अपराधी – गुन्हेगार समजून त्याचे आयुष्य उध्वस्थ होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी ही आपल्या सामाजिक व्यवस्थेची आहे.

आज मुलं-मुली दिवस-दिवसभर टी.व्ही समोर बसून असतात. इंटरनेट, मोबाईलचा सर्रास वापर वाढला आहे. व्हाटसअप, फेसबुक, यु-ट्यूबसह सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यामुळे पालक – मुलांचा संवाद कमी होत चालला आहे. एकत्र कुटुंब पद्धती आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवण्याची पद्धत केव्हाच लोप पावलेली आहे. पालक आपल्या नोकरी – उद्योग- व्यवसायात गुंतलेले असतात. त्यांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. मुले तासानतास मोबाईल, टी.व्ही मध्ये काय बघतात…? काय करतात…? हे खुद्द पालकांनाही माहीत नसते.

पालक आणि मुले यांच्यात संवादाचा अभाव असल्यामुळे मुले काय करतात हे पालकांना माहीत नसते तर पालक काय करतात हे मुलांना माहीत नसते. यामुळे मुले एकलकोंडी बनतात, चांगल्या संस्काराला मुकतात.
आई-वडील लक्ष देत नाहीत, चुकलं तरी रागावत नाहीत आणि आपण काय करतोय याची कधीच चौकशी करत नाहीत. याच गोष्टीचा फायदा घेऊन मुले इंटरनेटच्या माध्यमातून पोर्नोग्राफी व्हिडीओ पाहणे, विविध प्रौढ मासिके व पुस्तकांचे वाचन करतात. यातून किशोरवयीन मुला – मुलींचे लैंगिक शमन आणि दमन होते. मुला-मुलींची घुसमट होते. अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. मनामध्ये अनेकप्रकारचे गैरसमज निर्माण होतात. लैंगिक उत्सुकतेबरोबरच मनामध्ये भीतीची भावना घर करून बसते. मुलं लैंगिकतेचे शिकारी होतात. या सर्व गोष्टींना कोवळी मुले बळी पडतात. यातून लैंगिक आरोग्य धोक्यात येते. हे वेळीच रोखणे आणि जागृती करणे ही काळाची गरज आहे.

या सर्व लैंगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि लैंगिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी लैंगिक शिक्षणाची तर गरज आहेच पण त्याचबरोबर समुपदेशन , संवाद तसेच शिक्षक व पालकांबरोबरच समाजाचा भावनिक आधार आणि मानसिक पाठबळ गरजेचे आहे. तरच समाजातील सर्व घटकांचे लैंगिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.


लेखन
परशुराम माळी
शिक्षक
अनुभूती स्कूल,जळगाव.
parashuram.mali1121@gmail.com
8830493401 / 7588663662

संदर्भ –
https://www.wikipedia.org/
https://marathivishwakosh.org/3170/
www.marathi.aarogya.com
https://vikaspedia.in/
https://letstalksexuality.com/sexuality-education-3/

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

सुप्रिम कंपनीत १००० कामगारांपैकी आढळुन आले २६ कामगार पॉझिटिव्ह

Next Post

तांदुळवाडी येथे , शेत शिवारात चोरांचा धुमाकुळ

Next Post
तांदुळवाडी येथे , शेत शिवारात चोरांचा धुमाकुळ

तांदुळवाडी येथे , शेत शिवारात चोरांचा धुमाकुळ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications