<
तांदुळवाडी ता. भडगाव
येथील परिसरात गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात अनेक गुरांच्या व जलपरी मोटार यांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणावर दिसुन येत आहे
सध्या कोरोना महामारी रोगाचा प्रादुर्भाव जलद गतीने वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
अश्या परिस्थितीचा फायदा घेऊन परीसरातील अट्टल चोरट्यांनी धुमाकुळ घातलेला आहे.
तांदुळवाडी येथील आदर्श शेतकरी तसेच कर्जबाजारी श्री. अमोल आनंदराव पाटील वय (३७) रा. तांदुळवाडी ता.भडगाव यांचे गावालगत असलेल्या शेतातुन दरवर्षी गुरांची चोरी होत आहे साधारणतः यांच्याकडे सतत पाच वर्षाच्या कालखंडात साडे चार लाखापर्यंत गुरांची चोरी झालेली असुन हे शेतकरी हे चोरीच्या सानिध्यातून पुर्णपणे चोळला गेलेला आहे.
दि.१९/४/२०२१ च्या रोजी मध्यरात्रीच्या २च्या सुमारास दोन बैल आणि एक गाय त्यांच्या गळ्यातील दोर व घुंगरू तोडून शेतात फेकून भुरट्या चोरट्यांनी अशी विकृत कृत्य केलं असुन साधारणतः एक लाख वीस हजार किमतीचे गुर चोरल्याने शेतकरी अमोल पाटील पूर्णपणे भयभाईत झालेला आहे, तरीही मळगाव,तांदुळवाडी ,भोरटेक वडाळा दरवर्षी गुर व जलपरी मोटार ची चोरी नेहमी नेहमी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना चिंतेचा विषय निर्माण झालेला आहे…तरी प्रशासनाने व परिसरातील पोलिस निरीक्षक यांनी या भुरट्या चोरांचा ताबडतोब बंदोबस्त करून,भुरट्या चोरट्याना लवकरात लवकर गजाआड करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे.