Wednesday, July 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/04/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
राज्यातील अठरा वर्षावरील ३६ लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २२ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे २०२१ पासून लस दिली जाणार असून यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालयातील सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची अंमलबजावणी दि. १ मे २०२१ पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक असून त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोनाबाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, असे श्री. सामंत यांनी सांगितले.

यावेळी, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, सर्व अकृषि विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

१३ विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

बोदवड च्या पत्रकाराचा कोरोना ने घेतला बळी

Next Post

बोदवड च्या पत्रकाराचा कोरोना ने घेतला बळी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo