<
जळगाव – (प्रतिनिधी) – एक तारखेपासून अठरा वर्षापुढच्यांना लस मिळणार यामुळे सगळेच लस घेण्यास प्राधान्य देणार आणि एकदा लस घेतली की नंतर किमान दोन महीने रक्तदान करता येणार नाही. बर्याच मोठ्या प्रमाणावर हा वर्ग रक्तदानासाठी अपात्र होईल आणि मग रक्ताची कमतरता भासेल आणि सध्या ऑक्सिजन आणि रेमडिसेव्हर वरून जे महाभारत चालू आहे त्याची परिणती रक्तासाठीच्या लढाईत होईल. ऑक्सिजन, औषधं या मानवनिर्मित गोष्टी असून सुध्दा सद्य स्थितीत आपण सर्व जण त्याच्यावर मात करू शकलो नाही. आणि देव न करो रक्ताच्या बाबतीत जर आशी काही परिस्थिती निर्माण झाली तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. विज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरी आपण रक्त किंवा त्याला पर्याय निर्माण करू शकलो नाहीत.
सरकारकडून पण याबाबतीत ठोस धोरण निश्चित करायला हव. जे रक्तदान करतील त्यांना लस घ्यायला प्राधान्य देणं किंवा वेळप्रसंगी थोडा पुढचा विचार करून या वयोगटातील निरोगी, सूद्रृढ लोकांना रक्तदान सक्तीचे करणं यासारख्या पर्यायावर गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा.
आठरा ते पंचेचाळीस हा वयोगट हा सम्रृध्द रक्तदात्यांचा वर्ग आहे त्यांनी ऊत्स्फुर्तपणे आधी रक्तदान करून मग कोविड-१९ ची लस घ्यावी असे आवाहन रेड प्लस रक्त पेढीचे संचालक भरत गायकवाड यांनी केले आहे. रक्तदान शिबीराचे आयोजन करायचे असल्यास ७०३८७०३८९२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.