<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी जे. व्ही. कवळदेवी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मौजे भराडी येथे डॉ.मनोज पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका भोळे , डॉ. आश्विनी कुरणकाळ, आरोग्यसेवक संदीप सावकारे, गटप्रवर्तक नीलिमा गवळी, गावातील आशा कार्यकर्त्या यांच्या मदतीने कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.एकूण 52 जणांच्या तपासणी करण्यात आली. सदर प्रसंगी जामनेर तालुक्याचे आमदार माजी जलसंपदा मंत्री यांनी भेट दिली व ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या कामकाजाचे कौतुक केले. तसेच नागरिकांनी कोणतेही लक्षण आढळून आल्यास तात्काळ कोरोना चाचणी करून उपचार व विलगीकरणात राहिल्यानेच संसर्ग नियंत्रणात येईल.
तसेच सर्व नागरिकांनी न घाबरता लसीकरण पूर्ण करावे असे आमदार महाजन यांनी सांगितले.