Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती स्थापण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/04/2021
in राज्य, लैंगिक शिक्षण
Reading Time: 1 min read


जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 28 – महिला कर्मचारी यांचा कामाच्या ठिकाणी छळ होत असल्यास कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत Sexual Harassment electronic Box (SHEBOX) या ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणालीवर महिलेने आपली तक्रार नोंद करावी. तसेच कार्यालय प्रमुखाने अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करुन त्याचा अहवाल विहित नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जळगाव यांना 30 एप्रिल, 2021 पर्यंत सादर करावा. याबाबत कार्यवाही न केल्यास कलम 26 क प्रमाणे 50 हजार रुपये इतका दंड संबंधित कार्यालय प्रमुखांवर आकारण्यात येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संघटना, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा यांची शासनाने स्थापन केली असेल किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल किंवा पूर्ण किंवा अशंत: प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष निधी शासनामार्फत किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा शासकीय कंपनी किवा नगरपरिषद किंवा सहकारी संस्था अशा सर्व आस्थापना तसेच कोणतेही खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, एन्टरप्राईझेस अशासकीय संघटना, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठादार, विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक, औद्योगिक, आरोग्य इत्यादी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठाधारक रुग्णालय सुश्रृषालये, क्रिडासंस्था, प्रेक्षागृहे, क्रिडासंकुले इ. नियमात नमुद केलेल्या शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयाच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छाळापासून संरक्षण (प्रतिबंध मनाई व निवारण) अधिनियम 2013 कलम 4 (1) अन्वये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. तसेच समितीचा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये लावणे तसेच अधिनियमातील कलम 6 (1) अन्वये जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती गठीत करणे कायद्याने बंधनकारक आहे.
या अधिनियमानुसार ज्या कार्यालयात 10 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत अशा कार्यालयात अतंर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. आणि ज्या कार्यालयात 10 हून कमी कर्मचारी आहेत. उदा. असंघटीत क्षेत्र, शासकीय, खाजगी, लहान अस्थापना किंवा जेथे नियुक्ती प्राधिकाऱ्याविरुध्द लैगिक छळाची तक्रार आहे. अशा कार्यालयातील लैगिक छळाची तक्रार जिल्हास्तरावरील स्थानिक तक्रार समितीकडे करावी.
अधिक माहितीसाठी Jalgaon.nic.in व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केद्राजवळ, जळगाव दूरध्वनी क्र. 0257-2228828 अथवा [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

राज्य शासन व ग्रामप्रशासन सुलज यांच्या कोरोनाबाबत असलेल्या निर्देशांचे स्वागत करत भाजीपाला विक्रेत्यांनी केली नाराजी व्यक्त

Next Post

रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला वाफेची मशीन भेट

Next Post
रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला वाफेची मशीन भेट

रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला वाफेची मशीन भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d