<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या ५८ व्या वाढदिवस तसेच वन विभागातील ३८ वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्तीचे औचित्य साधून प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरला रुग्णांच्या सेवेसाठी वाफेची स्टीमर मशीन भेट देण्यात आली. प्रसंगी कोवीड केअर सेंटरचे व्यवस्थापक भरत कर्डिले (युवक जिल्हाध्यक्ष, लोकसंघर्ष मोर्चा जिल्हा जळगाव), सचिन धांडे, डॉ. क्षितिज पवार, विष्णू राजे निंबाळकर तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी रवींद्र तायडे (जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ), ब्रह्मानंद तायडे (जिल्हा सचिव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ) साधना बाविस्कर (उपाध्यक्ष )बापू साळुंके, (जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना ), योगेश अडकमोल(सह सचिव), संदीप हिरोडे, घनश्याम अहिरे (कास्ट्राईब भुमिअभिलेख संघटना जळगाव) आदी उपस्थित होते.