<
ठाणे – (प्रतिनिधी) – मुलुंड भांडूप मध्ये कोरोना संसर्ग रोगाची परिस्थिती गंभीर होत असून, त्या तुलनेत खासगी आणि महापालिकेच्या बेडसची संख्या अपुरी पडत असल्याने माजी खासदार संजय दिना पाटील, श्री सुनील राऊत आणि श्री रमेश कोरगावकर यांच्या अथक प्रयत्नाने मुलुंड जकात नाका येथे 30 खाटांचे केाविड सेंटर सुरू करण्यात आले असून, कोविड सेंटरचे उद्घाटन युवा सेनेचे अध्यक्ष नामदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज करण्यात आले.
माजी खासदार संजय दिना पाटील, सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यांच्या पुढाकाराने नवीन 30 बेडचे कोविड आयसीयू सेंटर्स सुरू करण्यासाठी आमदार सुनिल राऊत व आमदार विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी राज्य शासनाकडे व मनपा प्रशासन यांच्या कडे सातत्याने प्रयत्न करीत त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळेच हे कोविड सेंटर अल्पावधीत सुरू करण्यात यश आले.
आमदार सुनील राऊत यांनी सांगितले की, उद्घाटनाचे कोणतेही सोपस्कार न होता किंवा कोणताही गाजावाजा न करता रुग्णांच्या हितासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन करावे , आणि रुग्णांवर तातडीने उपचार सुरू व्हावेत असे विचार आमदार सुनील राऊत यांनी मांडले. आणि आदित्य ठाकरे आणि ते मान्य करून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले. यावेळी ईशान्य मुंबईतील सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीस बेडचे कोविड सेंटर्स सुरू करण्याच्या दृष्टीने सकाळपासून पहाणी केली. याठिकाणी कोविड केअर सेंटरचे काम अतिशय वेगाने सुरू असून, या ठिकाणी बाधित रुग्णांना उपचार करण्यासाठी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे,
मुलुंडच्या जकात नाका
नाक्याजवळ कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना आयसीसीयु सह व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचे बेड उपलब्ध होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित अधिकारी, पालिका उपायुक्त देविदास क्षिरसागर , उपायुक्त तसेच आरोग्य विभाग उपायुक्त मनपा, तसेच मनपा टी विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी, डॉक्टर प्रदीप आंग्रे तसेच सर्व मनपा अधिकाऱ्यांनी कंबर कसली होती.