<
विद्यापीठाच्या २९व्या दीक्षांत समारंभात “लॉ ऑफ क्राईम” या विषयांत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यालाच सुवर्णपदक द्यावे -महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन
जळगाव – (प्रतिनिधी) – विद्यापीठांच्या २९ व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठांकडुन विधि अभ्यासक्रम ( जुना / नवीन )मधील law of crime या विषयांत सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला गुरुवर्य अँड.अच्युतराव अत्रे सुवर्णपदक देण्यात येते यावेळी हे सुवर्णपदक
कुकरेजा संजना विरेंद्रकुमार ह्या एस.एस.मणियार विधी महाविद्यालय,जळगाव या विद्यार्थीनीला तिला ५९/१०० गुण प्राप्त झालेले आहे म्हणून जाहीर करण्यात आलेल आहे परंतु आमच्या निदर्शनास असे आले आहे कीी एस.एस.मणियार विधी महाविद्यालयची दुसरी विद्यार्थीनी पटेल डिंपल विनोद हिला सुद्धा law of crime या विषयांत ६३/ १०० गुण मिळालेले आहेत व ते पहिल्या विद्यार्थीनी पेक्षा जास्त आहेत तरी आपल्या विद्यापीठांच्या नियमानुसार सुवर्णपदकाची खरी मानकरी पटेल डिंपल विनोद ही विद्यार्थ्यानी आहे. विद्यापीठाकडून नजरचुकीतून जर चूक झाली असेल तर ठीक आहे परंतु हे जाणूनबुजून झाले असेल तर हा डिंपल पटेल हिच्यावर झालेला अन्याय आहे.
याच संदर्भात विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.इ.वायुनंदन सर यांना महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे राज्य संघटक अरुण कवरसिंग चव्हाण व प्रदेश सहसचिव दिपक सपकाळे यांना तात्काळ आँनलाइन निवेदन देण्यात आलेल असुन ही चूक तात्काळ सुधारून पात्र विद्यार्थ्यांनीला न्याय मिळवून द्यावा असे नमूद केले आहे. विद्यापीठाचे परीक्षा संचालक यांना ही चूक कळली असुन ते यात सुधारणा करणार आहेत असे त्यांनी मासूचे राज्य संघटक श्री. अरुण चव्हाण यांना फोनद्वारे आश्वासन दिले आहे.