Tuesday, July 8, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महापौर महाजनांकडून ‘कोरोनायोद्ध्यां’चा सन्मान; ‘जागतिक कामगारदिनी’ भेट घेऊन केले कौतुक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महापौर महाजनांकडून ‘कोरोनायोद्ध्यां’चा सन्मान; ‘जागतिक कामगारदिनी’ भेट घेऊन केले कौतुक

जळगावच्या प्रथम नागरीक, महापौर सौ. जयश्रीताई महाजन आज (1 मे 2021) सकाळी लवकर उठून आपले दैनंदिन पारिवारिक नियोजन करून महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित शहरातील विविध शासकीय कार्यक्रमस्थळी हजर राहण्याकरिता आपल्या गाडीद्वारे घराबाहेर पडल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय ध्वजवंदन संपन्न झाले. त्यानंतर सौ. जयश्रीताईंच्या मनात विचारांची घालमेल सुरू झाली अन् विचार आला, की ‘कोविड-19’चे थैमान गेल्या वर्ष-सव्वावर्षभरापासून सुरू आहे. या काळात जीवाची पर्वा न करता कुटुंबीयांसह स्वतःची काळजी घेत शहरातील जनतेला अहोरात्र प्रामाणिकपणे सेवा देत कर्तव्यापासून दूर न जाणार्‍या विविध क्षेत्रांतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अर्थात कोरोनायोद्ध्यांना प्रत्यक्ष भेटावे अन् त्यांच्या भावना आपण महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून जाणून घ्याव्यात. तसेच याचवेळी त्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांना शुभेच्छाही द्याव्यात. त्या अनुषंगाने सौ. जयश्रीताई हा संकल्प हाती घेऊन आपल्या गाडीने मार्गस्थ झाल्या.
सुरूवातीला सौ. जयश्रीताईंनी शहरातील सुपरिचित गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा देऊन तोंडभरून कौतुक केले. याप्रसंगी संचालक डॉ. शीतल ओसवाल, ‘सीईओ’ तेजस जैन व संदीप भुतडा यांच्याशी चर्चा करून ‘कोविड-19’च्या संक्रमण काळात अहोरात्र देत असलेल्या प्रामाणिक सेवेसह त्यांच्या स्वनिर्मित ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर सौ. जयश्रीताईंनी ‘वसंतस् दि सुपरशॉप’ला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच तेथे ग्राहकांना शिस्तबद्धपणे दिल्या जाणारी सेवा प्रत्यक्ष अनुभवली. याप्रसंगी संचालक नितीन रेदासनी यांनी आपल्या व्यवसायासह सुपरशॉपनजीक होणारी वाहन पार्किंगची समस्या व त्यामुळे होणारी ग्राहकांची अडचण यासंदर्भात महापौर सौ. जयश्रीताईंशी चर्चा केली. तेथून सौ. जयश्रीताईंनी मोटेल कोझी कॉटेजच्या पेट्रोलपंपाला भेट देऊन तेथील कर्मचार्‍यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांच्या सेवेविषयी चर्चा केली. मात्र, याचवेळी संचालक प्रकाश चौबे हे महापौर सौ. जयश्रीताईंची अचानक भेट व कर्मचार्‍यांच्या केलेल्या सत्काराने भारावून जात भावूक झाले अन् म्हणाले, ‘माझ्या आयुष्यप्रवासात प्रथमच पेट्रोलपंपावरील कर्मचार्‍यांचा महापौरांकडून सत्कार व्हावा, ही बाब अतिशय संस्मरणीय आहे. आपल्याला मी या कार्यासाठी मनापासून शुभेच्छांसह धन्यवाद देतो’. यानंतर सौ. जयश्रीताईंनी दि जळगाव पीपल्स बँक, रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्ट संचालित राजेश्री श्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलला भेट दिली व तेथील कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याचवेळी हॉस्पिटलमधील प्रसूती विभागात जाऊन तेथील महिलेची व तिच्या कन्येची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. सौ. जयश्रीताईंची ही कृती पाहून प्रत्यक्ष उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी भारावून जात या कार्याची मनमोकळेपणाने चर्चा करत त्यांचे कौतुक केले. त्याचवेळी जळगाव शहर महानगरपालिकेच्या ‘कोविड-19’ लसीकरण केंद्रालाही सौ. जयश्रीताई भेट देऊन डॉ. राम रावलानींची भेट घेत त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. रावलानी अत्यंत भावनावश होऊन सौ. जयश्रीताईंचा छोटेखानी सत्कार करताना म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून मी रुग्णालयाच्या माध्यमातून जनसेवा करीत आहे. मात्र, आजचा दिवस माझ्यासाठी अन् या रुग्णालयासाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. त्याचे कारण स्वतः महापौर म्हणून तुम्ही दिलेली भेट’.
सौ. जयश्रीताईंनी औद्योगिक वसाहतीतील कोगटा उद्योग समूहाच्या गोपाल दालमिललाही भेट दिली. तेथील कर्मचार्‍यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी नामदेव कोळपे हे कर्मचारी भावविभोर होऊन बाजूला होऊन म्हणाले, ‘मी बर्‍याच दिवसांपासून दालमिलमध्ये कार्यरत आहे. परंतु महापौरपदावरील एका महिलेच्या हातून माझा सत्कार होतो, ही गोष्ट माझ्यासाठी अवर्णनीय आहे’. याप्रसंगी संचालक प्रेमभाऊ कोगटा, अनुप कोगटा, अतुल कोगटा व त्यांच्या सहकार्‍यांनीही महापौर सौ. जयश्रीताईंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचवेळी प्रेमभाऊ कोगटा यांनी ‘औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना महापालिकेकडून वर्षानुयवर्षांपासून सतत मिळणारी सापत्नभावाची वागणूक थांबवून आतातरी आपल्या माध्यमातून सहकार्याचा हात मिळायला हवा. औद्योगिक वसाहतीतील खुल्या भूखंडांवर महापालिकेच्या माध्यमातून काही चांगले प्रोजेक्ट करता आले, तर त्यासाठी आम्हीही निश्चितपणे सहकार्य करू, अशी साद घालत महापौर सौ. जयश्रीताईंना आश्वस्त केले. तसेच आपल्या हातून औद्योगिक वसाहत असो की शहर जळगावकरांना नक्कीच कायम स्मरणात राहील, असे डोळ्यात साठवता येऊ शकेल, असे कार्य करण्याचे सुचविले’. यानंतर सौ. जयश्रीताई तेथून आपल्या निवासस्थानाकडे रवाना झाल्या.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

विद्यापीठाच्या २९ व्या दीक्षांत समारंभात law of crime या विषयांत द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक जाहीर ;विद्यापीठाचा गलथान कारभार समोर

Next Post

अर्थचक्र लाॅक; जनता डाऊन-हर्षल सोनार

Next Post

अर्थचक्र लाॅक; जनता डाऊन-हर्षल सोनार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications