<
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे
आज रोजी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचे इनचार्ज जाधव साहेब यांना शेळगाव ग्रामपंचायती च्या माजी तसेच विद्यमान ग्रामसेवक यांच्या तक्रारीचे निवेदन दिले.यावेळी युवासेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख अॅड.भरतजी पवार,चिचखेडा तवाचे उपसरपंच अमित तडवी, शिवसेना फत्तेपुर तोडापुर विभाग प्रमुख मोहन जोशी,हातिम तडवी,अमोल कोळी, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
शेळगाव ग्रामपंचायती चे मा.ग्रामसेवक के.एल.पाटील यांची बदली होऊन जवळपास एक वर्ष होत आले असून त्याचा कडे असलेले बॅंकेची महत्त्वाची कागद पत्रे,कॅशबुक रजिस्टर,प्रोसोडिग बुके व इतर महत्त्वाची कागदपत्रे ग्रामपंचायती मध्ये संबंधित ग्रामसेवक यांना अवलोकनासाठी मिटीग मध्ये मागणी केली असता मागील ग्रामसेवकांने मला चार्ज देते वेळी दिली नाही.मी वेळोवेळी मागणी करुन सुध्दा तारीख पे तारीख देत आहे.असे सांगत आहेत.त्यामुळे सदर कागदपत्रे व दप्तराविषय माजी ग्रामसेवक के एल पाटील यांना विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात.तसेच पंचायत समितीच्या वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे वेळोवेळी चौकशी केली असता त्यांना दप्तर देण्याबाबत नोटीस दिल्याचे.गेल्या चार महीण्यापासुन हेच उत्तर देऊन आपले हात झटकत आहेत यामुळे पंचायत समितीचे काही अधिकारी त्यांना पाठीशी घालतात कि काय असा शंका येत असुन मा.गटविकास अधिकारी यांनी त्वरीत चौकशी करावी.अन्यथा ग्रामस्थांनसह उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
तसेच विद्यमान ग्रामसेवक देखील कोरोनाचे संकट असताना ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक नसल्याने अडचण येत आहे.तसेच गावातील गटारी तसेच सार्वजनिक विजेचे दिवे, याची समस्या भेडसावत आहे.तसेच ग्रामपंचायती ची एकच मासिक मिटीग झालेली आहे.तरी संबंधित ग्रामसेवक यांना समज देऊन अथवा नवीन ग्रामसेवकांची नियुक्ती करावी.अशी मागणी शिवसेना जामनेर विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य निळकंठ पाटील यांनी नुकतेच प.स.गटविकास अधिकारी यांचे इनचार्ज जाधव साहेब यांना निवेदना द्वारे केले आहे.