जळगाव - (प्रतिनिधी) - येथील डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाचा एल एल बी व एल एल एम विदयार्थ्यांचा ऑनलाईन फे्रशर्स सोहळा विविध कार्यक्रमांनी रंगला. या कार्यक्रमात डॉ एन एझोपे, अॅड पूजा, अॅड खुशबू जैन, प्रा. मोईन शेख यांनी विधी मधील संधी व वाटा या विषयावर मार्गदर्शन केले. नितीन चौधरी, उर्मीला राजपूत, गौरव पाटील, मोहन कोचुरे, विशाल सोनार, सागर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य एस जी गाडगे यांनी मार्गदर्शन करतांना अभ्यासात मेहनत, सर्मपण, वक्तशिरपणा याला महत्व असून यशस्वी होण्याचा हा मंत्र आहे. नवीन गोष्ट शिकण्याची सवय विदयार्थ्यांनी लावून घ्यावी असे आवाहन करत स्वागत केले. गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी दृरदृष्टी ठेवत मार्गदर्शन प्रोत्साहन दिले याबददल आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वी साठी अॅड प्रविण पाटील ग्रंथपाल मनिषा इंगळे प्रा विजय चौधरी प्रा विद्या बोरनारे यांनी परिश्रम घेतले.
Like this:
Like Loading...