<
जळगाव – येथील निलॉन्स इमारतीच्या वर बिघाड झालेल्या मोबाईल टावर च्या दुरूस्ती करीता तंत्रज्ञ टावर वर चढला खरी पण याची सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची?
सदर करागिराच्या डोक्यात हेल्मेट नाही,जमिनी पासुन किमान २०० ते २५० फुट आहे वरतुन खाली पडल्यास जबाबदार कोण? अशा बेफिकरीने काम करणााऱ्या कंपन्याांवर कारवाई करण्याची मागणी जनमानसात होत आहे.
कंपनीच्या कारागिरांना कंपनी संरक्षण साहित्य पुरवत नसेल का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यापुर्वी बर्याच अशा घटना घडलेल्या आहेत व त्यात कारागिरांना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. यात कारागिरांचा देखील निष्काळजीपणा असल्याचे ही बोललेे जात आहे.