<
लोककलावंता साठी सर्वतोपरी मदत करणार- रजनीकांत कोठारी
कोरोणाच्या या महामारीत सर्व घटकावंर मोठा परिणाम झाला आहे.परंतु कलेवर पोट असणारा लोककलावंत महामारीत होरपळून निघाला आहे.
परंतु या वर्षभराच्या काळात आनेक संकटाचा सामना करीत कोरोनाने उध्वस्त होत चाललेल्या जिल्ह्यातील लोककलावंता स्थिती अत्यंत हलाखीची होत चालली आहे.. लोकरजंनाचे, लोकप्रबोधनाचे अविरत पणे कार्य करणा-या लोककलावंता कडे शासना सोबतच मायबाप रसिकांनी देखील पाट फिरवल्यामुळे लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हयात सध्य स्थितीत तमाशा मंडळ शाहीरी पथके, वहीगायन कलापथक, वाघ्या मुरळी, गोधळी , वासुदेव, सोंंगाड्या पार्टी, आदी कलाक्षेत्रात कार्यरत लोककलावंत या कोरोना महामारीचा सामना करीत करीत आहे.
या परिस्थितीत लोकलावंताना मदत करण्यासाठी सामाजिक आत्मभान आसणारे सृजनशील उद्योग पती, के के कँन्स उद्योग चे प्रमुख रजनीकांत कोठारी (काकाजी) यांच्या वतीने लोककलावंत यांच्या साठी किराना मालाचे किट्स खान्देश लोककलावंत विकास परिषद चे अध्यक्ष विनोद ढगे यांच्या कडे सुपूर्त केले..
व या पुढे लोककलावंत साठी जी ही मदत लागेल ती करण्यात येईल असे सांगितले.
या प्रसंगी भरारी फाऊंडेशन चे दिपक परदेशी, सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर अरविंद पाटील उपस्थित होते.