<
मा. नगरसेवक अमोल पाटील व सामाजिक कार्यकर्ते विशाल (पप्पू ) पाटील यांचा पाठपुरावा
भडगाव – (प्रतिनिधी) – येथील उज्वल कॉलनीतील ट्रान्सफॉर्मर चे काम काही दिवसांपासून रखडले होते. त्याकामी पर्यायी मार्ग शोधून त्वरीत उपाययोजना करण्यात आली व १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर त्वरीत सुरू करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली . याचा उज्वल कॉलनीतील रहिवाशांना जास्ती दाबाचा वीज पुरवठा होउन त्यांना वारंवार होणारा त्रास बंद होईल. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे अमोल पाटील व विशाल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याला प्रतिसाद देऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामाला गती दिली व पोल उभारणीच्या कामाला सुरुवात करून आज रोजी काम पूर्णत्वाकडे येत असून आज सायंकाळी अथवा फारतर उद्या सकाळी नव्या डि पी वरून उज्ज्वल कॉलनीतील रहिवाशांना पूर्णदाबाने वीजपुरवठा सुरु होईल अशी माहिती उपकार्यकारी अभियंता श्री अजय धामोरे साहेब तसेच सहा अभियंता श्री राऊळ साहेब यांनी कळविली. सदर डिपी व इलेक्ट्रीक पोलचे काम हे केंद्र शासनाच्या आय.पी.डि.एस.(I P D S) योजनेतून करण्यात आले आहे.उज्ज्वल कॉलनी भागातील रहिवाशांना सदर कामामुळे कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाली आहे.