<
मुंबई – (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु ) ह्या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थ्याचा हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाच्या लढा देण्याचं कार्य करीत आहे.
मासुच्या गव्हर्निंग कौन्सिल कार्यकारणी मधे मोठा फेरबदल करण्यात आलेला असुन.गेल्या दोन वर्षामध्ये केलेल्या कार्याच्या आधारावर गव्हर्निंग कौन्सिल कार्यकारणीमधे फेरबदल होणे गरजेचे होते जेणेकरुन इतर सदस्यांना संधी प्राप्त होईल त्याअनुषंगाने संस्थापक अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी विशेष अधिकारांचा वापर करुन “कार्यकारी अध्यक्ष ” या पदाची निर्मिती केलेली असुन हे पद संघटनेतील संस्थापक अध्यक्ष पदानंतरचे दुसरे सर्वोच्च पद असेल हे त्यांनी स्पष्ट केले.
यापुढे मासूची गव्हर्निंग कौन्सिल कमिटी हि पुढील प्रमाणे राहिल.
१. अॅड .सिद्धार्थ सोनाजी इंगळे – संस्थापक अध्यक्ष
२.अॅड.सुनिल प्रताप देवरे- सह संस्थापक तथा ” कार्याध्यक्ष “
३.श्री.प्रशांत वसंत जाधव – सह संस्थापक तथा “उपाध्यक्ष”
४.श्री.अरुण कवरसिंग चव्हाण – “सचिव” तथा अध्यक्ष – उत्तर महाराष्ट्र प्रदेश
५.श्री.सिद्धार्थ हिरामण तेजाळे – ” राज्य संघटक”,मीडिया कोआँर्डिनेटर तथा अध्यक्ष- नाशिक विभाग.
“कार्यकारी अध्यक्ष” व “उपाध्यक्ष” यांना संघटनेच्या ध्येय,उद्दिष्ठापूर्तीसाठी काही विशेष निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेल आहे असे संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांनी म्हटले आहेत.