<
जामनेर(प्रतिनिधी)- तालुक्यात दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागात लग्न समारंभ, अंत्ययात्रा, दारावर जाण्याची प्रथा, बाजार इ. कोवीड नियमांचे पालन न केल्यामुळे कोरोना चा संसर्ग झपाट्याने वाढला. पहिल्या लाटेपेक्षा तो अधिक होता. सुरुवातीला शहरी भागात व नंतर ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून आले. तालुक्यात एकूण ११०७९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले पैकी १०७९५ बरे झाले तर १४५ रुग्णांचा मृत्यू झाला. १३९ रुग्ण हे सध्या उपचाराखाली आहेत. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण हे अधिक होते. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मृत्यु अधिक झाले. तालुक्याचा बरे होण्याचा दर हा ९४.१६% असून पॉझिटिव्हीटी दर २% खाली आला आहे. मृत्यू दर हा १.३१ इतका आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संचारबंदी व लॉक डाऊन च्या काळात मुख्यधिकारी राहुल पाटील व पोलीस निरीक्षक जामनेर प्रताप इंगळे, पहूर पो.स्टे.पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी राबविलेल्या कडक कारवाईच्या सत्रामुळे, रिकामटेकडे फिरणाऱ्यांवर ठेवलेला चाप तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केलेल्या नियोजनानुसार वैद्यकीय अधिकारी, समुदाय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक यांनी प्रत्येक गाव गावात जाऊन कोरोना टेस्टिंग चे कॅम्प चे आयोजन करण्यात आले.यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास तात्काळ ग्रामपंचायतीला कळवून त्याला होमकोरंटाईन चा सल्ला देण्यात आला. तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने प्रत्येक गावात “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या मोहिमेची प्रभावीपणे अंबालबजावणी करून संशयीत शोधून काढले. तसेच बधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. त्याचप्रमाणे तालुक्यात तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या निर्देशानुसार कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास मृतांच्या परिवारातील सदस्यांच्या व त्याच्या संपर्कातील नागरिकांच्या ४८ तासाच्या आत कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ग्रामीण भागाच्या आरोग्य यंत्रणेने व जामनेर नगरपालिकेने अधिकाधिक चाचण्या केल्या तर वैद्यकीय अधीक्षक डॉ.विनय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.आर.के.पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.जितेंद्र वानखेडे यांनी व जामनेर-पहुर च्या सर्व स्टाफ नर्स,आरोग्य सेविका,वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्रित मिळून अत्यवस्थ रुग्णांवर योग्य उपचार व सेवा करून मृत्यू दर कमी ठेवला. यानंतर ही मास्क,वारंवार हात धुणे,एकमेकांपासून अंतर ठेवणे, गर्दी न करणे व आपली पाळी आल्यानंतर लसीकरण करून घेतल्यास पुढील येणारी तिसरी कोरोना ची लाट टाळू शकतो.