Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

म्युकर मायकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
म्युकर मायकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करुन देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 28 (जिमाका) – जिल्ह्यात आढळून येणाऱ्या म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री व औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यासाठी लागणारा आवश्यक तो निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करुन देण्यात येईल. असे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज सांगितले.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील म्युकर मासकोसीस वॉर्डास आज भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांशीही संवाद साधला. त्यांनतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा रुग्णालयाचे प्रशासन डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेसह महाविद्यालय व सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर्स उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात म्युकर मायकोसीस आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून याठिकाणी 50 खाटा ठेवण्यात आल्या आहेत. सद्यपरिस्थितीत याठिकाणी 15 रुग्ण उपचार घेत असून पैकी 2 रुग्णांवर आवश्यक त्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या रुग्णांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या अतिशय किचकट आणि जोखमीच्या असतात. यासाठी लागणारी साधनसामुग्री महाविद्यालयात उपलब्ध असणे आवश्यक असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी यावेळी दिली असता यासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात. त्याचबरोबर जिल्ह्यातील म्युकर मासकोसीसच्या कोणत्याही रुग्णांस उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागणार नाही याची दक्षात प्रशासनाने घ्यावी. आवश्यक त्या सुविधांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या टिमचे यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील कोविड, नॉन कोविड रुग्णांच्याउपचाराचाही आढावा घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी सज्ज राहा – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Next Post

नागरी दलीत वस्ती सुधार योजनेतंर्गत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 31.61 कोटींच्या निधी वितरणास पालकमंत्र्यांची मान्यता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d