<
ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी /गाऱ्हाणी सोडविण्यासाठी
जळगाव – ग्रामीण भागातील महिलांच्या तक्रारी/ गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन 26 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला लोकशाही दिन, जळगाव (ग्रामीण भाग) यांनी दिली आहे.
जळगाव तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या तक्रारी व गाऱ्हाण्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, (ग्रामीण भाग) जळगाव यांनी एका केले आहे.