<
अमळनेर – (प्रतिनिधी) – समाजात मानवी हक्कांविषयी जागृती करणारी पुणे येथील मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेची अमळनेर तालुका कार्यकारिणी नुकतिच गठीत करण्यात आली. त्यात अमळनेर तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष बन्सिलाल आसाराम भागवत, सचिव संदीप बाबुराव घोरपडे, सहसचिव राहुल पाटील, संघटन सचिव सुषमा वासुदेव देसले, सह संघटन सचिव राजश्री राजेश पाटील, रिपोर्टिंग आॅफिसर गीतांजली संदीप घोरपडे, सह रिपोर्टिंग आॅफिसर अनिता मोरे, पब्लिसिटी आॅफिसर मनोज शिंगाणे आणि पब्लिसिटी आॅफिसर शिवाजी मोहन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भारतीय संविधानाने प्रत्येक मानवाला हक्क आणि कर्तव्य दिले असून त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. मात्र बºयाचदा या मानवी हक्कांची पायमल्ली होत असते आणि परिणामी मानवावर अन्याय होत असतो. हा अन्याय होऊ नये म्हणून अन्याय व अत्याचार पिडितांच्या न्याय, हक्क व अधिकारांसाठी सनदशिर मार्गाने आवाज उठवून सदर संस्था न्यायासाठी विधीतज्ञांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर संघर्ष करीत आहे. त्याच अनुषंघाने अमळनेर तालुक्यातही अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून नुकतीच तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीचे निवडपत्र संस्थापक अध्यक्ष विकास कुचेकर, संचालक आण्णा जोगंदड व विधितज्ञ अॅड. सचिन झालटे-पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.