<
औरंगाबाद(प्रतिनिधी)- सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जिवन कोलते व इतर शेतकरी यांनी सावळदबारा तलावाच्या पुर्ण संचय पातळी लगत रस्त्याची मागणी करत आज रोजी उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले होते. तरी उपविभागीय कार्यालया मार्फत सदरील शेतकऱ्यांना उपोषणापासून परावृत्त होण्यास विनंती केली असून शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. या रस्त्याच्या मागणी करीता १८ जून रोजी सावळदबारा येथील काही शेतकरी धरण भिंती लगत उपोषणाला बसले होते. परंतु, ऐनवेळी मागणी केलेला रस्ता हा कोणत्याही बाधित होणाऱ्या रस्त्यास पर्यायी रस्ता नसून, अशा प्रकारे धरणाच्या पुर्ण संचय पातळी लगत रस्ता करणे हे तांत्रिकदृष्टीने संयुक्तिक नाही तसेच अशा प्रकारे शेत रस्ता करणे हे जलसंपदा विभागामार्फत अपेक्षित नाही. या तांत्रिक अडचणीमुळे सदरील प्रस्ताव जलसंपदा विभाग मुख्य अभियंता यांनी अमान्य केला आहे.दिनांक २/९/२०१९ रोजीऔरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत प्रकल्पावरील निरीक्षण दौरा दरम्यान सदरील रस्ता हा पालकमंत्री पाणंद योजनेअंतर्गत प्रास्तावित करण्याच्या संबंधीतांना सूचना देण्यात आलेल्या होत्या व त्याअनुषंगाने जाळीचा देव व पांदी रस्ता ते फत्तेपूर बाबा टेकडी पर्यंत ३ किमी लांबीचा व २४ फूटरुंद रस्ता करण्याबाबत शिवाजी निर्मळ खेडा जिल्हा बुलढाणा यांना उतखन यंत्राचा वापर करण्याकरिता आपल्या कार्यालयाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. सदरील रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करुन काम पुर्ण करण्यास आपल्या कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे. तरी आपल्या स्तरावरून निगर्मीत केलेल्या आदेशानुसार संबंधित कंत्राटदारास रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे या करिता कार्यवाही व्हावी. या शेत रस्त्याची मागणी करत असलेले शेतकरी यांना उपोषणापासून परावृत्त होण्यास आपल्या स्तरावरुन प्रयत्न व्हावेत. मागणी लवकर मान्य न झाल्यास सर्व शेतकरी जलसमाधी घेणार हे आता निश्चित केलेलं आहे. असं शेतकऱ्यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.