<
५ जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युवा जनकल्याण संस्था,युगंधर फाऊंडेशन,सोलापूर आणि जिनिअस ग्रीन सोशेल फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने युनो ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या वर्षी जास्तीत जास्त लोक सहभाग व युवकांना एकत्र घेऊन पर्यावरण जनजागृती व संवर्धन-संरक्षण उपक्रम घ्यावेत यासाठी या स्पर्धांचे अयोजन करण्यात येत आहे.करोना च्या पार्श्वभूमीवर लोकांनी सामाजिक अंतर पाळून सुरक्षित घरात राहून देखील पर्यावरण विषयक उपक्रमात सहभागी व्हावे म्हणून निबंधस्पर्धा,ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धा, यांचे आयोजन करून जास्तीत जास्त लोकांचा यामध्ये सहभाग वाढवून जनजागृती करण्याचा मानस आहे अशी माहिती युवा जनकल्याण चे अध्यक्ष श्रीकांत पारधी यांनी दिली.या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व विजेत्याना आकर्षक बक्षिसे व रोख रक्कम खुला गट गटासाठी 1500,1000,700 रु ,शालेय गट 1100,700,500 तर व्हिडीओ स्पर्धे साठी 1500,1100,750 रु इतकी असेल तसेच देऊन सन्मानित करण्यात येईल.स्पर्धेच्या समन्वयक म्हणून युगंधर फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रा रेश्मा माने सोबत मारुती पाटील असतील ,तरी जास्तीत जास्त विद्यार्थी ,नागरिक व तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
५ जून जागतिक पर्यावरण दिन विशेष
निबंध स्पर्धा
खुला गट
1 ) वृक्षवल्ली आम्हा सोयरे
2 ) पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज
3) कोरोना व पर्यावरणवर परीणाम
4 ) पक्षी पर्यावरण दूत
शालेय विद्यार्थी गट
5वी ते 10वी
1) माझे घर माझी बाग
2) महाराष्ट्र राज्यातील
जैवविविधता
3)माझे आवडता प्राणी/पक्षी/झाड इ.
4) इको फ्रेडली सिटी ही माझी जबाबदारी
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम
1)निबंध स्वहस्ताक्षर मध्ये लिहून इमेल /व्हाट्सएप करावे
2)स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेटवची तारीख 10जून असेल
3) शब्द मर्यादा 400 ते 500 शब्द शालेय गट
4) 1000ते 1500 शब्द मर्यादा खुला गट
5)कॉपी पेस्ट माहिती किंवा निबंध नसावेत स्वानुभवातून जास्त भर असावा
6) नाव,पत्ता,शाळेचे /कॉलेजचे नाव व संपर्क क्र व्यवस्थित लिहावा
व्हिडीओ स्पर्धा
आपल्या परिसरातील जैवविविधता, बाग ,नैसर्गिक सौंदर्य, प्राणी/पक्षी / यांचे 1मी चा विडिओ बनवून त्याद्वारे त्यांची नोंद घेणे
नियम – व्हिडीओ घेत असताना कॅमेरा/मोबाईल मध्ये
बॅकग्राऊंड ला कोणत्याही इतर आवाज किंवा संगीत नसावे यांची काळजी घ्यावी.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना 12जून 2021पर्यंत आपले निबंध/ व्हिडीओ दिलेल्या इमेल वर इमेल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क
9518577465,
इमेल -reshmamane21@gmail. com