<
जळगाव – (प्रतिनिधी) – कोरोना माहामारी चा प्रकोप बघता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य विभागात 16 हजार पदे भरती करण्यात बाबत, नुकतेच राज्य आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांच्या कडून जाहीर करण्यात आले आहे, या भरती प्रक्रियात गेल्या वर्षभऱ्या पासून आपल्या जीवाची पर्वा न करता, या माहामारीच्या काळात दिवस रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर- लॅब ऑपरेटर – लॅब असिस्टंट – टेक्निशियन – – – – नर्सेस – वार्ड बॉय – सफाई कामगार – सुरक्षा रक्षक – इत्यादी कंत्राटी पद्धतीने वा खासगी रुग्णालयात सेवा देणाऱ्यानां प्रथम प्राधान्य महाराष्ट्र शासनाने द्यावे या करीत, महाराष्ट्र चे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( Social ) तर्फे निवेदन सादर करण्यात आले आहे. संपूर्ण देशात कोरोना रोगाच्या महामारीने हाहाकार माजलेला आहे, त्यात आपल्या राज्याचा हालही काही वेगळा नाही, महाराष्ट्र राज्यात वाढत्या करोना रोगाच्या साथीमुळे आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या राज्य सरकारच्या आरोग्य मंत्री मा,राजेश टोपे यांनी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पद भरती घेत असून त्यातील अ आणि ब वर्गातील प्रत्येकी दोन हजार, अशा एकूण ४ हजार पदांसाठी तसेच
क आणि ड वर्गातील १२ हजार डॉक्टर्स, २ हजार ब वर्गातील डॉक्टर्स (मेडिकल ऑफिसर्स), २ हजारापर्यंत स्पेशलिस्ट असे २ हजार टेक्निशिअन, नर्सेस, वॉर्डबॉयपासून ते शिपायापर्यंत भरती केली जाणार आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भरती प्रक्रिया चे आदेश काढण्याचे अधिकार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे देण्यात आले आहे. तरी महोदय आपणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( Social ) सलग्न समता सैनिक दला कडून निवेदन करण्यात येते की, सदर भरती प्रक्रिया करताना गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी च्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटणाऱ्या आरोग्य विभागातील कंत्राटी व खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या लोकांना भरती प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्यात यावे, जिल्हा रुग्णालयात – ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या डॉक्टर- लॅब ऑपरेटर – लॅब असिस्टंट – टेक्निशियन – – – – नर्सेस – वार्ड बॉय – सफाई कामगार – शिपाई – सुरक्षा रक्षक – इत्यादी यांना प्रथम प्राधान्य महाराष्ट्र शासनाने द्यावे. जेणे करून त्यांच्या वर अन्याय्य होणार नाही. अशी मागणी RPI ( Social ) चे राजाध्यक्ष विजय निकम यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन व्दारे केली आहे.