<
जळगाव, (जिमाका) दि. 4 – छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन यापुढे शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शिव स्वराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यावतीने इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज -पुराभिलेखीय साधने’ या विषयावर जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.
या व्याख्यानाचे प्रसारण शनिवार, 5 जून, 2021 रोजी सायंकाळी 5.30 वाजता जळगाव आकाशवाणीवरुन व newsonair.com या ॲपवरुन होणार असून याचे पुर्नप्रसारण शिव स्वराज्य दिनी (रविवार) 6 जून रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे, तरी श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी केले आहे.