<
जळगांव(धर्मेश पालवे)-सध्या शहरी सुशोभीकरण आणि रस्ते बांधणी चे काम आघाडीवर सुरू असल्याचे चित्र आहे. या बाबत नेहमी प्रसिद्धीपत्रात बातम्या येत आहेत. शहरातील बऱ्याच ठिकाणी खड्डे व गतिरोधकाने झालेले अपघात ही नेहमी चर्चेचे विषय झाले आहेत. मात्र या बाबत प्रशासकीय व्यवस्थेने काहीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही.
गेल्या आठवड्यात सतत धार पाऊस सुरू असतानाही शहरातील ख्वाजामियाँ चौक ते कोर्ट चौक पर्यंत च्या रस्त्यावर काम सुरू आहे,ज्यात रस्ता दुभाजक,खड्डे भरणे, व विद्युत खांब बसवून रस्त्यावर सुसूत्रा आणन्याचे काम सुरू आहे.याच रस्त्यावर नूतन मराठा कॉलेज, प्राथमिक शाळा ,महानगर पालिका शाळा,व विविध बँक ऑफिस आणि हॉस्पिटल ही आहेत, जेथे शाळकरी, तरुण,व कामगार लोकांच्या वर्दळीच्या लोकांचा वावर असतो. आणि याकडे महानगरपालिकाने संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात प्रशासकीय स्तरावर काहीही उपाययोजना केल्या नसल्याच दिसून येत आहे.रस्त्यावर अतिक्रमण,मोठ्या प्रमाणात रहदारी असून येथे या कामामुळे नेहमी गर्दी होत असते, वाहनांचा खोळंबा होतो असेही दिसून आलं आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुरू असलेल्या कामात सुसूत्रता आणावी व जनतेस अपायकारक होणाऱ्या परिणामास टाळावे असा सूर या ठिकाणी लोकांकडून लावला जात आहे.