<
भुसावळ – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ येथे शनिवार, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उपक्रम घेण्यात आला. यात पेपर बॅग तयार करणे, बियाण्याचे गोळे तयार करणे, वृक्षारोपण यासारखे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करुन घेण्यात आले असून पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक पर्यावरण दिन हा संयुक्त राष्ट्राचा दिवस म्हणजे जगभरातील जागरूकता आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करणारा दिवस. सन १९७४ पासून पर्यावरण विषयावर दबाव आणण्याच्या प्रयत्नातून जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. गेल्या दशकांपासून आपण आपल्या ग्रहांच्या परिसंस्थेचे शोषण व नाश करीत आहोत आणि आधुनिकीकरणाच्या नवीन युगात वनक्षेत्र कमी करीत आहोत. “जंगले ही आमच्या भूमीची फुफ्फुस आहेत, हवेची शुध्दीकरण करतात आणि आपल्या लोकांना नवीन शक्ती देतात ”, त्यामुळे निसर्गाचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.