Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पर्यावरणदिनी जैन ददइरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
पर्यावरणदिनी जैन ददइरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण

जैन हिल्स येथे वृक्षारोपण करताना डॉ. अनिल ढाके, डॉ. बी.के. व सहकारी.

कंपनीच्या सहकाऱ्यांनी घेतला वृक्ष जगविण्याचा संकल्प

जैन हिल्स येथे वृक्षारोपण करताना जैन प्लास्टिक पार्कचे सहकारी.

जळगाव, दि. ५ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनच्या जैन प्लास्टिक पार्क, जैन हिल्स, जैन फूडपार्क व टाकरखेडा टिश्युकल्चर पार्क अशा विविध आस्थापनांमध्ये जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने कंपनीचे अधिकारी व सहकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. वृक्षारोपण केवळ इव्हेंटपुरता न ठरता खऱ्या अर्थाने पर्यावरणाचे जतन करण्यासाठी वृक्ष जगविण्याचा संकल्प कंपनीच्या सहकाऱ्यांनी घेतला.

जैन प्लास्टिक पार्क –

जैन प्लास्टिक पार्क येथे भोकर, शिरम, कांचन, नीम, वड आदिंचे वृक्षारोपण केले. आजचे वृक्षारोपण प्रातिनिधी स्वरूपाचे असून नजिकच्या काळात मोकळ्या जागी, रस्त्याच्याकडेला सुमारे साडेपाचशे हून अधिक झाड लावले जातील. या कार्यक्रमास आर.एच. काकडे, अतिनकुमार त्यागी, योगेश बाफना, व्ही.एम. भट, ए.ओ. मुंगड, हेमंत तारकर, राजश्री पाटील, आनंद बलोदी, सुरेंद्र नारखेडे आदि सहकारी उपस्थित होते.

टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा–

टिश्युकल्चर पार्क इ ब्लॉकमध्ये आज प्रातिनिधीक स्वरुपात ५० वृक्षरोपण केले गेले. यात फायटो सॅनेटायझेशनचे इन्स्पेक्टर डॉ. राम सिंग या पाहुण्यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. यावेळी विजयसिंग पाटील, के.बी. पाटील, सिक्युरिटी ऑफिसर इंद्रकुमार सिंग आदि सहकारी उपस्थित होते.

जैन फूड पार्क व जैन हिल्स

जैन व्हॅली येथील ईसीआरसी वेअर हाऊसच्या परिसरात सुमारे दीडशे रोपे लावण्यात आले. याच परिसरात यथावकाश सुमारे ३ हजाराहून अधिक वृक्षारोपण केले जाणार आहेत. या कार्यक्रमास एस.डी. गुप्ता, डी.जे. शितोळे, जी.आर. पाटील, जी.आर. चौधरी, एस.बी. ठाकरे, बी.व्ही. बडगुजर, प्रमोद शिंदे, दीपक कापसे, योगेश पवार आदी सहकारी उपस्थित होते. जैन हिल्स येथे देखील सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. अनिल ढाके, डॉ. बी.के, अजय काळे, रवी कमोद, संजय सोनजे, प्रसाद साखरे आदि सहकारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

निसर्गाचे नियम समजून घेऊन विकास कामांचे नियोजन आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

Next Post
मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d