<
जळगांव(धर्मेश पालवे)-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विविध मुद्यावरून नेहमी चर्चेत आले असून जिल्ह्यातील नावाजलेले असे प्रमाणित व गुणवत्तापूर्ण अभ्यास देणारे विद्यापीठ आहे.
नुकतेच या विद्यापिठाला कवयीत्री बहिणाबाई चौधरी या नावाने नामांतर झाले आहे.याच विद्यापीठाशी संलग्न एस एस मणियार लॉ कॉलेज आणि डॉ उल्हास पाटील लॉ कॉलेज मधील विधीशास्त्र च्या शाखेच्या विद्यार्थ्यानी या वर्षी नापास झालेल्या विद्यार्थ्यानी काही मागण्या साठी आमरण उपोषनास बसले आहेत.साल २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकाला मध्ये सर्व विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाणे केलेल्या अन्याबाबत हे उपोषण असून,आम्ही विद्यार्थी उद्याचे कायद्याचे विद्यार्थी असून भावी वकील आहोत मात्र आज आम्हालाच अन्यायस्पद वागणूक देऊन अन्याय केला जात आहे.सदर वर्षी च्या झालेल्या विधी परीक्षेच्या निकालास विद्यापरिषद सभेच्या ठराव क्रमांक ए -७०/२०१९दि २५/०५/२०१९हा लागू करने, विधी शाखेच्या विद्यार्थ्याना ४०ची पासिंग व ४०ची ऍग्रिगेट लागू करणे,आणि व विद्यापीठाणे ४०ची पासिंग बाबत तोंडी दिलेले आश्वासन पूर्ण करणे या प्रमुख मागण्या साठी हे आमरण उपोषण सुरू असल्याच, आणि जे पुणे, मुबंई सारख्या विद्यापीठात ४०%पासिंग चे एग्रीग्रेट लागू आहे तेच आम्हाला ही लागू व्हावं ,मात्र तसे न होऊ देणे हा उत्तर महाराष्ट्र् विद्यापीठाचा मानस आहे असे दिसून येत आहे. या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरू आहे आणि सुरूच राहील असे उपोषणार्थी अभिजित रंधे, श्रीकांत सोनवणे, निलेश जाधव,निलेश भालेराव,कोमल गायकवाड,अंकित चव्हाण,प्रतीक चव्हाण,वैभव पाटीक यासह इतर उपोषणार्थीनी सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींशी संपर्क साधत माहिती दिली.