<
– विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी राबवली ‘मी रक्तदाता’ ही संकल्पना
सेव्हल हिल रुग्णालयाच्या मदतीने आयोजित रक्तदान शिबीर – रक्तदात्यांना देण्यात आले ‘मी रक्तदाता’ चे प्रमाणपत्र तर कोविड योद्धांचा करण्यात आला सन्मान
मुंबई :राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरीकांचे प्राण वाचविण्यासाठी शासन-प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस विभाग, सङ्गाई कर्मचारी, दिवस रात्र, सामाजिक संस्था, संघटना तसेच मंडळे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. भविष्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तांची कमतरता भासु नये म्हणुन तसेच रुग्णांच्या उपचारार्थ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदरणिय मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याची आवाहन केले आहे.
त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सामाजिक जाणिवेची भावना लक्षात घेऊन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राच्यावतीने शिवराज्याभिषेका दिनी ‘मी रक्तदाता’ ही संकल्पना राबवली.जोगेश्वरी (पूर्व) शामनगर तलाव येथे आयोजित रक्तदान शिबीरात ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असल्याने विधानसभा क्षेत्रातील विविध गृहनिर्माण संस्था, सामाजिक संस्था, विविध मंडळे, तरुण युवक मित्र मंडळ यांनी रक्तदान केले. यात सफाई कर्मचारी यांनी देखिल आपली सामाजिक जाणीवेची जबाबदारी पार पाडीत रक्तदान केले.
या शिबीरात एकुण १३५ रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या. या शिबीराचे उद्घाटन वायकर यांच्या हस्ते तसेच सेवह हिल रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी महारुद्र कुंभार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सेवन हिल रुग्णालयाच्या मदतीने आयोजित या रक्तदान शिबीरात रक्तदात्यांना वाङ्गेचे भांडे, मास्क, कप, रत्नागिरी जिल्ह्याची परिपुर्ण माहिती असलेले पुस्तक तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी कोरोनाच्या काळात दिवस रात्र मेहनत करणार्या करोना योद्धांचा प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला.
शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधित नुतनीकरण करण्यात आलेल्या सेवालय कार्यालयाचे उद्घाटन वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. राहुल महाले, विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, बाळा साटम, जयवंत लाड, के. एल. पाठक, नगरसेवक बाळा नर, नगरसेविका रेखा रामवंशी, शाखाप्रमुख मंदार मोरे, नंदु ताम्हणकर, प्रदिप गांधी, संदिप गाढवे, महिला उपविभाग संघटक प्रियंका आंबोळकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, शिवसैनिक, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याआधी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या काही शाखांनी ट्रामा केअर रुग्णालयाच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजनकेले आहे.