<
जळगाव – (प्रतिनिधी) – एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एन. माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एनटीव्हीएसच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे येथील प्राचार्य डॉ. बहिराम व्ही.वाय., प्राचार्य डॉ. बी. युवाकूमार रेड्डी यांची सन्माननीय उपस्थीती लाभली. कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ. डी.आर.क्षीरसागर, डॉ. विजेता सिंग, डॉ. रेखा पाहुजा, प्रा. गणपत धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदर, प्रा. अमिता वराडे, प्रा. ज्योती भोळे सहभागी झाले.
यावेळी न्या. माने यांनी कार्यशाळेचे उद्घाटन डीजीटल पद्धतीने करून ऑनलाईन उपक्रमाचे कौतूक केले व संशोधक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ.चौधरी यांनी मानवी विकासातील संशोधनांचे महत्व अधोरेखीत केले. डॉ. बहिराम यांनीही संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तदनंतर डॉ. रेड्डी यांनी संशोधन अहवाल लेखनाचे कौशल्य आणि प्रात्यक्षीक दृष्टीकोन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. क्षीरसागर यांनी संशोधनासाठी माहिती संकलनाचे शास्त्रीय पद्धती आणी साधने संदर्भात मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. विजेता सिंग यांनी संशोधन पद्धती आणी संशोधनाची तत्वे संदर्भात मांडणी केली.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन केले तर समन्वयक प्रा. धुमाळे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व शेवटी डॉ. महाजन यांनी सहभागी मान्यवरांचे आभार मानले.