<
बोदवड(संजय वराडे)-अन्नाच्या शोधार्थ वन्यजीव गावाकडे येत असतात, काही प्राणी लडा लागल्याने गावातच प्रस्थान होत जगतात, तर काही पोटाची खडगी भरली की पुन्हा वनात प्रचारण करतात. हे प्राणी कधी कधी मानवी चुकीने मृत होत असताना आपण पाहत असतो,आणि कुठेतरी त्या प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून शासन व जनता इतिकर्तव्य म्हणून विसरूनही जाते.
मात्र, बोदवड तालुक्यातील जामठी येथे आगळेवेगळे ,मानवतेचं चित्र पाहायला मिळाले .जामठी या गावा लगत असणारे मुजोबां घाटी रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने वानराला धडक दिल्याने हे वानर मृतपाय पडले होते,गावातील तरुणांना ही बातमी कळताच सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधी संजय वराडे यांच्याशी संपर्क साधत सर्व माहिती दिली. वनाधिकारी मा बच्छाव साहेब यांना सत्यमेव जयते च्या प्रतिनिधींनी संपर्क करून कळवले असता रात्र झाल्याने घटनास्थळी पोहचण्यास अडचन निर्माण होत आहे ,असे सांगत वनाधिकारी चे प्रतिनिधी सोनवणे साहेब यांना पाठवले त्यांनी वाणराच्या अंतिमसंस्काराची परवानगी दिली. क्षणाचाही विलंब न करता जामठी येथील युवकांनी तयारी करत वाणराचे अंतिम संस्कार केले.या साठी काही स्थानिक तरुण,गावकरी,व वनविभागाचे सोनवणे साहेब हजर होते.