<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. ९ – पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई ४००००१ येथे दि. २६ जून, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या अदालतीत टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बॅंक, प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत एम शांतला भट्ट, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि.) आणि सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे पाठवावी.
प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या वेबसाईट www.maharasthrapost.gov.in वर उपलब्ध आहे. असे अधीक्षक, डाक कार्यालय, जळगाव विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.