<
वरणगाव येथे 18 जूनला महिलांचे चे आमरण उपोषण
वरणगाव – (प्रतिनिधी) – येथे नगरपरिषदे वर महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ प्रणिताताई पाटील चौधरी यांच्या नेतृत्वात असंख्य महिलांचा धडक मोर्चा आणण्यात आला. वरणगाव शहराला 12 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहे.
तसेच नगरपरिषद अस्तिवात आल्यानंतर नगरिकांना 24 तास पाणी देणेबंधनकारक आहे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भाजपा सरकारच्या काळात 25 बाय 7 अशी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यावर स्थगिती दिल्यानं व टेंडर रद्द केल्याने पिण्याची योजना सुरू होत नसल्याने हा पाणी प्रश्न बिकट होत आहे.
मंजूर पाणी योजनेचे काम जलद गतीने सुरू करा या मागण्यासाठी आज नगर परिषदेवर धडक मोर्चा महिला आघाडीने नगरपरिषदेवर आणला होता.
यावेळी मुख्यधिकारी समीर शेख पाणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे पुरवठा अभियंता गणेश चाटे प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी शहराध्यक्ष भाजपा सुनिल माळी जिल्हाउपाध्यक्ष एड ए जी जंजाळे भाजयुमो अध्यक्ष संदीप भोई कामगार नेते मिलिंद मेढे सरचिटणीस गोलू राणे कृष्णा माळी संदीप माळी श्री शशीभाऊ चौधरी,डॉ प्रवीण चंदने डॉ सादिक डी के खाटीक हितेश चौधरी भाजयुमो सरचिटणीस आकाश निमकर पप्पू ठाकरे गजानन वंजारी योगेश माळी हिप्पी सेठ यांच्यासह सौ संगीता माळी सौ नीता तायडे
शंकर पवार हजर होते.
“पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे
हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे….
अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. शहराध्यक्ष सौ प्रणिता पाटील चौधरी यांनी वरणगाव करांना नवीन योजनेचे पाणी येण्यापूर्वी 6 दिवसाच्या आत पाणी नियमित मिळाले पाहिजे मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम जलद गतीने सुरू करा अन्यथा 18 जून रोजी महिलांचे आमरण उपोषण नगरपरिषद समोर करण्यात येणार आहे.
यादरम्यान कमी जास्त झाल्यास नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील असा इशारा महिला आघाडीच्या वतीने दिला.
मुख्यधिकारी भुसावळ ला मीटिंग ला गेल्याने मुख्यधिकारी वरणगावला आल्या शिवाय महिला नगरपरिषद मधून जाणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतल्याने वातवरण तापले होते. अखेर मुख्यधिकारी यांना मीटिंग सोडून वरणगाव ला 15 मिनिटात यावे लागले.
मुख्यधिकारी समीर शेख यांनी पाणी 6 दिवसांनी येईल असे सांगितले. तसेच मंजूर पाणी पूवठा योजनेचे काम जलद गतीने लवकरच सुरू करण्याबाबत ठेकेदाराला नोटीस काढण्यात येईल व मंजूर योजनेचे काम जलद गतीने सुरू करण्यात येईल, असे यावेळी मोर्चाकरांना मुख्यधिकारी समीर शेख यांनी सांगितले.
यावेळी जयेश कपाटे, दीपक चौधरी, राहुल जंजाळे, महिला मोर्चाचे सौ संगीता माळी, सौ नीता तायडे, अलका वाणी, गंगुबाई माळी, सुवर्ण भावसार, दुर्गा तायडे, सविता पाटील, सुषमा पुनासे, इंदू शिंपी, अशा जाधव, स्मिता जोशी, प्रणिता माळी, कल्पना वाणी, जोती गोसावी, कल्पना जोशी, रिता जाधव, सरला अमोडकर, विमाक्षा पटेल, सौलचना चौधरी, जोती वाणी, मंगला महाजन, वैभव वाणी, शुभम अमोदकर, विशाल चौधरी, दिलीप पटेल, उदय वाणी, दगडू माळी, दीपक जाधव यांच्यासह असंख्य महिला उपस्तीत होत्या.