जळगाव – (प्रतिनिधी) – भाग्यदीप म्युझिक प्रस्तुत हंगामी रुदय स्पर्श करणारे शेतकरी आत्महत्या वर आधारित एक सुपरहिट मराठी गाणं घेऊन येत आहे देवा र…….
ह्या गाण्याचे नुकतेच मा.ना.एकनाथ राव खडसे यांच्या हस्ते पोस्टर रिलीज करण्यात आले असुन जळगाव जिल्हाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते टिझर रिलीज करण्यात आले
आपल्याला माहीत आहे भाग्यदीप म्युझिक नेहमी आपल्या भेटीला नवीन नवीन अर्थ पुर्ण गाणी घेऊन येत असते व त्यात सुंदर अश्या गोष्टी ज्यात समाज प्रबोधन होईल असे गीत सदर करत असते सर्वात आधी भाग्यदीप म्युझिक टीमने कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने तु पूर्ण चंद्रमा असे सुंदर प्रेमकहाणी सादर केली.
त्यानंतर सर्वांच्या मनावर राज्य करणारे कोळीस्पर्ष असलेले ट्विनकल ट्विंकल हे सुदर गीत सदर केले होते हे पाहिले खान्देशातील पहिले कोळीस्पर्ष गीत ट्विनकल ट्विंकल हे आपल्या भेटीला घेऊन आले असुन त्या गीताने तब्बल तीनच दिवसात एकलाख लोकांनी प्रतिसाद दिला असुन हा मोठा विक्रम ट्विनकल ट्विनकल या गीताने रचला. त्या लागोपाठ महाशिवरात्रीच्या पावन दिवसी शिवशंभू तेरे नामसे हे भाग्यदीप म्युझिक वरील प्रथम हिंदी गीत सर्वांच्या भेटीला घेऊन आले.
या सर्व गीतांच्या यशानंतर आता भाग्यदीप म्युझिक यांनी बळी राजाच्या जीवनावर आधारित शेतकरी आत्महत्या या विषयाला हाताशी घेऊन शेतकऱ्याच्या जीवनात कडत न कळत होनाऱ्या अन्याय व पिळवणूक त्याना होणारा त्रास या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आगामी येणारं गीत देवा रं…. या गीता मध्ये दिग्दर्शक प्रदीप भोई हे मांडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे या गीताचे चित्रीकरण धानवड ता. जि. जळगाव या ठिकणी ऐका तांड्या वस्ती मध्ये केले गेले असून याचे चित्ररेखाटन सौभाग्य सेनापती व गौरव मोरे यांनी केले आहे.
या गीताचे संकलन योगेश ठाकूर यांनी केले आहे. तसेच सहायक दिग्दर्शक म्हणून कुणाल पाटील आणि विभावरी मोरणकर यांनी केले असून गीतकार शुभम कुलकर्णी व संगीत श्रीनिवास मोढे (अमरावती) आणि गायक आकाश साठे (पुणे) यांनी केले आहे. या गिता मध्ये मुख्य स्त्रीभूमिका निशा तायडे यांची असून पुरुष भूमिकेमध्ये अक्षय राजपूत चारुदत्त पाटील सचिन कापडे गौरव मोरे व बाल कलाकार म्हणून जश शाहा हा चिमुरडा दिसून येईल.
गीताची मुख्य कहाणी ही शेतकरी आत्महत्या या विषयाला वाचा फोडणारी आहे. बळीराजा आपल्या देशाचा पोशिंदा आज मारतोय संपूर्ण जगाला दोन वेळेच अन्न खाऊ घालणारा आज उपाशी पोटी राहून मृत्यू पावतोय हा महत्वाचा विषय या गीताच्या मार्फत प्रदीप भोई यांनी समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
या गीताचे अनावरण करत असताना राष्ट्रवादी जिल्हा सांस्कृतिक अध्यक्ष गौरव लवंगले उपाध्यक्ष विभावरी मोरणकर तसेच प्रदीप, भोई,सौभाग्य सेनापती, गौरव मोरे, योगेश ठाकूर, अक्षय राजपूत, निशा तायडे, प्रांजल पंडित, संदीप मोरे, चारुदत्त पाटील उपस्तीत होते.
या गीताला विशेष सहकार्य म्हणून बंधन प्रोडक्शन,my-T Music, दक्षराज प्रोडक्शन, अरविंद एंटरटेनमेंट, दुनियादारी प्रोडकशन, राजस प्रोडकशन, ड्रीम स्टुडियो, ईश्वर हिरे, राहुल पाटील, संदीप मोरे, अजून खूप लोकांनी कार्य केले. व जळगाव शहरातील अनाथ गरीब मुलावर कार्य करणारी सामाजिक संस्था मनोधैर्य फाउंडेशन यांचे देखील सहकार्य लाभले आहे. आणि लवकरच हे गीत आपल्या भेटीला येईल तसेच सर्वांनी भाग्यदीप म्युझिक या युट्युब चॅनल ला जाऊन या गीताचा आस्वाद घ्यावा अशी विनंती सर्व भाग्यदीप म्युझिकची संपूर्ण टीम करीत आहे.