रावेर ता.प्रतिनिधी:-दि.१० विनोद कोळी
पुनखेडा ता.रावेर येथून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या पुनखेडा ते रावेर या दरम्यान असलेल्या भोकर नदीवर पुनखेडा-पतोंडी रोड सुमारे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आलेला होता.
नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे त्या ठिकाणचा भराव वाहून गेल्याने सदर पूल झुकला असुन पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. याठिकाणी नेहमी शेतकरी व वाहनांची वर्दळ असल्याने नदीपात्रातून तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता तयार केला असून त्यावरून बस, ट्रक, ट्रॅक्टर,मोटरसायकल, बैलगाडी इत्यादी वाहनांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण होण्याची दाट शक्यता आहे.तसे यापूर्वी देखील असे छोटे मोठे अपघात घडले आहेत.येथील पुनखेडा-पातोंडी रोड वरील पूल हा अतिशय जीर्ण झाला असून त्यावर अनेक मोठे खड्डे पडलेले आहेत अनेकदा या ठिकाणी अपघात होत असतात नुकताच काल दुपारी 4 वा, सुमारास या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहने ट्रॅक्टर हे पलटी झालेले आढळून येत आहे.हा पूल मध्यप्रदेश व विदर्भ ला जोडणारा असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची नेहमी वर्दळ असते सदर पूल हा पाच सहा वर्षांपूर्वीच मंजूर झालेला असून त्याचे टेंडर सुद्धा निघालेल्या आहेत असे लोक लोकप्रतिनिधींकडून नकळत सांगण्यात येत आहे.
परंतु प्रत्यक्षात या पुलाचे काम अद्यापही सुरुवात झालेली नाही. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याने अचानक पणे पाऊस पडल्यास नदीला मोठा पूर आल्यास हा एकमेव रस्ता असल्याने आठ ते दहा गावांचा संपर्क तुटू शकतो.तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या पुलामुळे फटका बसू शकतो.त्यामुळे मंजूर झालेले पूल अद्यापही का होत नाही असा सवाल पुनखेडा व परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सदर पुलावरील खड्या व पर्यायी रस्त्याच्या आजूबाजूला खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी? की अधिकारी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.तरी तात्काळ या पुलाचे काम सुरु व्हावे अशी मागणी पुनखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य दिगंबर राजू बोरसे,सामाजिक का.विनोद रामचंद्र कोळी(शिवा भाईG), विशाल कोळी, गोविंदा धनगर ,धीरज सावळे, प्रशांत पाटील ,अमोल धनगर इत्यादी नागरिक व युवा मंचाने मागणी केली आहे.