<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 11 – महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी झालेल्या न्यासांनी त्यांच्या न्यासांचे नामफलक हे मराठी भाषेमध्ये लावणे आवश्यक आहे. असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त र. प. बाठे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक मभावा-2019/ प्र.क्र.66/भाषा-2 मंत्रालय, मुंबई यांचेकडील 6 नोव्हेबर, 2020 च्या परिपत्रकानुसार न्यासांचे नामफलक मराठी भाषेमध्ये लावणे आवश्यक आहे. तथापि, न्यासांचे विश्वस्त/पदाधिकारी हे त्यांच्या न्यासांचे नामफलक मराठी भाषेतून दर्शनी भागामध्ये लावत नाहीत. असे धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निदर्शनास आले असून याबाबत त्यांनी तसे 2 जून, 2021 रोजी लेखी कळविले आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व न्यासाचे विश्वस्तांनी त्यांच्या न्यासाचे नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागामध्ये लावावेत. असे आवाहनही सहाय्यक धर्मादाय आयुक्त र. प. बाठे यांनी केले आहे.