<
दिनांक , ११-६-२०२१ रोजी संभाजी भोसले आपल्या कार्यकर्त्यां समवेत आमदार निलेश ज्ञानदेव लंके यांनी उभारलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे- शरदचंद्र पवार कोवीळ सेंन्टर भोळवणी ता. पारनेर जिल्हा, अहमदनगर येथे भेट दिली, संभाजी भोसले यांचा आमदार साहेबांनी फळ देऊन सत्कार केला.गोरगरिबांना कोवीळ महामारीतून सहजरीत्या वाचवणे या महत्वाकांक्षी कामासाठी हे कोवीळ सेंटर उभारले आहे असे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.
हजारो कोरोनाबाधीत रुग्ण एक रुपया सुध्दा खर्च न करता ठणठणीत बरे होऊन आनंदाने घरी गेले, आजही शेकडो रूग्ण या कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत,येथे अगदी सहजरीत्या व आनंदाने रूग्णांवर उपचार केले जातात. आजपर्यंत एकही रेमडीसीवर इंजेक्शन या ठिकाणी वापरले गेले नाही.
येथील आँक्सीजन प्रकल्प,रुग्ण-नातेवाईक-भेट देणारे या सर्वांची मोफत, जेवणाची व्यवस्था,उपचार पद्धती,डाॅक्टर्स व सहकारी कर्मचारी बांधवांची टिम असे पाहून आपण भारावून गेलो.भविष्यात आपल्या भागात गरज पडली तर आपण येथील प्रेरणा घेऊन अशाचप्रकारे सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी कार्य करू असे मानस संभाजी भोसले यांचे आहेत.आमदार निलेश लंके यांनी आपली आस्थेने विचारपूस करून आग्रहाने जेऊ घातले. असा आमदार जन्माला येण ही भगवंताची देण आहे. संभाजी भोसले यांचे समवेत भगवान पाटील,सुनील पाटील,विलास भिल्ल संजय पाटील आदी होते.