<
जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे
जामनेर शेतकरी सहकारी संघ येथे ज्वारी , मका खरेदी केंद्राचे शुभारंभ माजी जल संपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते तोल काटेचे पूजन करून. शेतकरी बांधवाला शाल व नारळ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
तसेच शेतकर्यांकडे हजारो क्विंटल ज्वारी व मका पडून आहे. परंतु शासनाने हमी भावात अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे १६५० क्विंटल ज्वारी१५०० क्विंटल मका खरेदी करण्याची ज्याचंक अशी अट घातली आहे त्यामुळे यातून फक्त वीस-पंचवीस शेतकऱ्यांची मका व ज्वारी खरेदी होऊ शकते. मग खरेदी केंद्र हे फक्त नावालाच सुरू केले जात आहे का असे असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी आपले धान्य बाहेर व्यापाऱ्याकडे देऊन आर्थिक नुकसान करायचे काय यातून असे दिसते की निवड शेतकऱ्यांची ही थट्टाच नाही तरशेतकऱ्यांशी ते खेळत आहे. काय शासनातर्फे ज्वारीला २६२०आणि मक्याला १८५० हमी भाव दिला जाणार आहे.
एवढी कमी प्रमाणात खरेदी ही शासनातर्फे केले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव बाहेर आपला मका व ज्वारी द्यावा लागणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. परिणामी असे दिसून येते की शासनाने शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा चालविली आहे असेही आमदार गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे, शेतकरी सहकारी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर उपसभापती बाबुराव गवळी संचालक सुरेश पाटील, रमेश नाईक मार्केट कमिटी सभापती संजय देशमुख,सचिव प्रसाद पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, नितीन झाल्टे ,रवींद्र झाल्टे,दीपक तायडे,यांच्यासह शेतकरी सहकारी संघ व मार्केट कमिटी संचालक व कर्मचारी आदी उपस्थित होते