<
ठाणे दि.15 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई कार्यालयाच्या वायुवेग पथका मोटार वाहन कायदा, 1988 चे कलम 207 नुसार व मुंबई मोटार वाहन कर कायदा, 12(ब) नुसार थकीत कर वसुलीसाठी व मोटार वाहन कायदा, 1988 च्या इतर गुन्ह्यासाठी दोषी आढळलेल्या वाहनांना प्रतिवादीत करुन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवीमुंबई तपासणी मैदानात 20 ऑटो रिक्षा अटकावून ठेवलेले आहेत. अशा वाहनांचा Online E-Auction पध्दतीने दि. 18 जून 2021 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नवी मुंबई येथे जाहिर लिलाव ठेवण्यात आला आहे.
लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन मालकांना वाहन सोडवुन घेण्याचीसंधी राहील, याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी. लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी या कार्यालयाचे सुचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुक व्यक्तिंना वाहनांच्या प्रत्यक्ष पाहणी वर नमुद केलेल्या स्थळीकरता येईल. सविस्तर माहितीसाठी संबंधित व्यक्तिंनी कार्यालयाशी संपर्क करावा.
तरी सर्व इच्छुक व्यक्तींनी लिलावामधे भाग घ्यावा. लिलावाच्या अटी लिलावाच्या अगोदर Online प्रसिध्द करण्यात येतील. असे कर वसुली अधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई यांनी कळविले आहे.