जळगाव-(प्रतिनिधी) – स्वीडन येथील इको ट्रेनिग सेंटर नाशिकच्याप्रादेशिक विद्या प्राधिकरण व बांगलादेश एलिमेंटरी एज्यूकेशन इन्स्टिट्यूटच्या विद्यमाने भारत- बांगलादेश टेलीकोलॅब्रेशन प्रकल्प राबवण्यात आला.
युनोने ठरवून दिलेल्या १७ शाश्वत विकासाच्या धेयाबाबत जागरूकता शिक्षक व विद्याथ्यांच्या माध्यमातून समाजात निर्माण व्हावी हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. एकूण १६ सेशनमधून भारत व बांगलादेशाची संस्कृतीची माहिती देखील दिली गेली. सदर प्रकल्पात बांगलादेशातील सौ.कविता रॉय,जळगाव मधून सौ.प्रतिभा पाटील, राहुल सोनावणे, रणजीत सोनावणे यांनी हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला.
प्रकल्प यशस्वितेसाठी नाशिकचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा.योगेश सोनावणे व समन्वयक श्री.भरत शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले.
या विशेष कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.पन्नालाल वंजारी,सचिव श्री.अशोक लाडवंजारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.दिनकर जोशी तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यातर्फे कौतुक करण्यात आले.