<
जामनेर-(प्रतिनीधी-शांताराम झाल्टे) – जामनेरचे गिरिश भाऊ महाजन गेल्या 25ते तीस वर्षा पासुन सत्तेत असून एका झटक्यात भाऊंच्या आज तीन समर्थकांनी भाऊला खाली पहाण्याची वेळ आणली आहे. माजी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे राईट हँड व कलयुगातील तीन शकूनी मामांना बी.एच.आर.घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
बी.एच.आर.पथ संस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या टीम ने शहरात दाखल होऊन शहरातील तीन जणांना ताब्यात घेतले.
यामुळे शहरात खळबळ उडाली असुन सविस्तर वृत्त असे की,
आज दि १७ जून २० २१रोजी सकाळी ६ च्या सुमारास पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेची पथक जामनेरात दाखल झाले व
त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर खंदे समर्थक जितेंद्र रमेश पाटील , छगन झाल्टे , व राजेश लोढा या तीन जणांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
संबंधीतांना पूणे येथील न्यायालयात उद्या हजर केले जाणार आहे .
या पथकात पो.नि.महादेव कुंभार , ए.पी.आय.टिळेकर , पो.हे.महिला कॉ.किंजळे , पोलिस नाईक गरुड , यांचा समावेश होता.